नवगाव मध्ये महाशिवरात्री उत्सव जल्लोषात साजरा

63

नवगाव मध्ये महाशिवरात्री उत्सव जल्लोषात साजरा

रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३

अलिबाग:- भाविकांची गर्दी… बँड पथकाची साथ… गुलालाची उधळण… भाविकांची अलोट गर्दी आणि हर हर महादेव चा जयघोष सारे कसे शिव महिमेने मंतरलेले या शिवभक्तीच्या महिम्यात नवगाव येथील बोरेश्वर महाराजांचा महाशिवरात्र उत्सव साजरा झाला.
दिनांक 26 फेब्रुवारी 2025 रोजी महाशिवरात्र निमित्त सकाळी 4 वाजल्यापासून मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी जमा झाली होती लहान मुलांपासून मोठ्या लोकांपर्यंत भाविकांची मंदिरात गर्दी दिसत होती.तसेच मंदिरात आपले नवस फेडण्यासाठी भाविकांची गर्दी जमा झाली होती.संध्याकाळी ठीक पाच वाजता बोरेश्वरच्या मंदिरातून पालखी मिरवणूक निघाली पालखीसोबत श्री रघुनाथ महाराज प्रसादिक भजन मंडळ सोबत होते. पालखी सोहळ्यामध्ये भाविक भक्तिभावाने हर हर महादेव चा जयघोष करत होते. पालखी सोबत महिला मोठ्या प्रमाणात दिसून येत होत्या.
पालखीसोबत नवगाव मधील तीन बँड पथक सोबत होते.चित्ताकर्षक श्री बोरेश्वर बँड पथक, कर्ण मधुर श्री ज्योती बँड पथक, सूर सम्राट श्री दत्तगुरु ब्रास बँड पथक यांची जुगलबंदी पाहण्यासाठी लोकांनी गर्दी जमा केली होती. तसेच पालखी सोबत प्राथमिक शाळेतील मुला,मुलींचे लेझीम डान्स सोबत होते. रायगड जिल्ह्यातून तसेच मुंबई पुणे येथून सुद्धा लोकांनी बँड ची जुगलबंदी तसेच नाटक पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती. नंतर ज्यांची लोक आतुरतेने वाट पाहत होते असे हास्य जत्रा फेम कलाकार प्रज्ञाकार आणि सोडम निर्मित लेखक/ दिग्दर्शक प्रसाद महादेव खांडेकर ‘ थेट तुमच्या घरातून` हे नाटक सुरू झाले.गुलालाची धुंदी आणि बँडची जुगलबंदी अनुभवल्यानंतर हे नाटक बघण्यासाठी सुद्धा लोकांनी अलोट गर्दी केली होती .