घरकुल बांधकामात अडवणूक झाल्यास तक्रार नोंदविण्याचे आवाहन

36

घरकुल बांधकामात अडवणूक झाल्यास तक्रार नोंदविण्याचे आवाहन

मनोज एल खोब्रागडे
✍🏻सह संपादक ✍🏻
मो 9860020016

अमरावती : – घरकुलांचे बांधकाम, मनरेगा किंवा अन्य कामे करताना ग्रामपंचायत किंवा तालुकास्तरावर लाभार्थींची अडवणूक झाल्यास किंवा लाचेची मागणी झाल्यास संबंधित गटविकास अधिकारी किंवा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तक्रार करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजना, ग्रामीण आणि राज्यपुरस्कृत आवास योजनेतील घरकुले मंजूर झाली आहे. सर्व लाभार्थींना मंजूरपत्राचे वाटप करण्यात आले आहे. घरकूल बांधकामासाठी लाभार्थींना पहिल्या हप्ताचे वितरण झाले आहे. लाभार्थींकडून विहित कालावधीत घरकुले बांधून पूर्ण करण्याची जबाबदारी तालुकास्तरीय यंत्रणेवर आहे. ग्रामविकास मंत्री यांनी आवास योजना, मनरेगा कामांची गुणवत्ता राखण्याची जबाबदारी संबंधित अधिकारी यांच्यावर सोपविली आहे. त्यामुळे घरकुल बांधकामात अडवणूक झाल्यास संपर्क क्रंमांक 7978504317वर तक्रार नोंदवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.