इंदिरा गांधी महिला महाविद्यालयात मराठी भाषा दिनानिमित्य विविध कार्यक्रमांचे आयोजन

43

इंदिरा गांधी महिला महाविद्यालयात मराठी भाषा दिनानिमित्य विविध कार्यक्रमांचे आयोजन
साहिल सैय्यद /प्रतिनिधि
📲9307948197

घुग्घुस:२७ फेब्रुवारी २०२५
ताज बहुउद्देशीय संस्था, वणी द्वारे संचालीत इंदिरा गांधी महिला महाविद्यालय, घुग्घुस येथे मराठी भाषा विभागातर्फे जागतीक मराठी भाषा दिनाचे औचित्य साधुन विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्रा. शहनाज पठान मॅडम यांनी कवीश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेला माल्यार्पन करून त्यांना वंदन केले. त्यानंतर बि.ए. व बी. कॉम च्या विद्यार्थिनिंनी महाराष्ट्रीयन वेशभूषेत राज्यगीत सादर केले. या प्रसंगी विद्यार्थिनिनी मराठी दिनावर आधारित आकर्षक रांगोळ्या काढल्या होत्या. त्यानंतर मराठी भाषा गौरव दिना निमित्य प्रश्नमंजुषेचा कार्यक्रम घेण्यात आला. मराठी विभागाच्या प्राध्यापकांनी अभिजात मराठी म्हणजे काय व मराठी भाषा कशी अभिजात भाषा ठरते यावर व्याख्यान दिलेत. त्यानंतर विविध प्रकारच्या सांस्कृतीक कार्यक्रम विद्यार्थिनिंनी सादर केलेत. मेघना वाघधरे या विद्यार्थिनिने संचालन केले. प्रा. तयब्बा पठान यांनी उपस्थितांचे आभार मानले. अशा या जागतीक मराठी भाषा दिनाचा भरगच्च कार्यक्रमाला महाविद्यालयाच्या सर्व प्राध्यापिका व शिक्षकेत्तर वर्ग आणि मोठ्या संख्येत विद्यार्थिनिंची उपस्थिती होती.