अलिबाग आक्षी येथील मच्छीमारी बोटीला आग :१८ खलाशी सुखरूप

97

अलिबाग आक्षी येथील मच्छीमारी बोटीला आग :१८ खलाशी सुखरूप
रत्नाकर पाटील
रायगड ब्युरो चीफ
९४२०३२५९९३

अलिबाग:-रायगड जिल्ह्यातील करंजा येथील समुद्रकिनारी डागडुजीसाठी मच्छिमार बोटी उभ्या करण्यात आल्या होत्या. डागडुजी सुरू असलेल्या दोन मच्छिमार बोटींना आग लागल्याची घटना ताजी असतानाच आज साखर गावातील राकेश मारूती गण यांच्या मालकीची बोट अलिबाग येथील भर समुद्रात आगीच्या विळख्यात आल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या आगीत गण यांचे सुमारे दोन कोटींच्या आसपास नुकसान झाले असून दैव बलवत्तर म्हणून बोटीवर कार्यरत असणारे अठरा खलाशी सुखरूप आहेत.

अलिबाग समुद्रात मच्छीमार बोटीला आग लागली असून, या आगीत बोट ८० टक्के जळून खाक झाली. बोटीवरील जाळी देखील जळाली. या बोटीवर १८ ते २० खलाशी असल्‍याची माहिती मिळत आहे. दरम्‍यान बोटीवरील सर्व खलाशी सुखरूप आहेत. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्‍याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. साखर गावातील राकेश मारूती गण यांच्या मालकीची ही बोट आहे. स्थानिकांच्या मदतीने बोट किनाऱ्यावर आणली. आग विझविण्याचे काम सुरू आहे.

कोस्ट गार्ड व नेवी च्या मदतीने बोटीमधील सर्व १८ खलाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले असल्याची माहिती पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिली