जिल्हाधिकारी कार्यालयात मराठी भाषा गौरव दिन साजरा

46

जिल्हाधिकारी कार्यालयात मराठी भाषा गौरव दिन साजरा

✍️अनिता हातेकर✍️
संग्रामपूर तालुका प्रतिनिधी
मो 8459775380

बुलडाणा : – ज्येष्ठ कवी वि. वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधुन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला. मराठी भाषेचा वापर प्रत्येकाने संवादासाठी करणे गरजेचे असून मराठी भाषेचे संवर्धन करण्याची जबाबदारी आपल्या प्रत्येकाची असल्याची भावना निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री ठाकरे यांनी केले.

मराठी भाषा गौरव दिनानिमित्य ‘घेऊ या एकच वसा, मराठीला बनवू ज्ञानभाषा’ हा संदेश देत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी उपजिल्हाधिकारी समाधान गायकवाड, उपजिल्हाधिकारी सुरेश थोरात, अधीक्षक अजित जंगम तसेच अधिकारी व कर्मचारी आदी उपस्थित होते.

स्टेट बँक ऑफ इंडियाचे मकरंद आपटे यांनी आर्थिक साक्षरता संदर्भात माहिती देऊन बँकेव्दारे चालवण्यात येणाऱ्या निवृत्त योजना, टर्म प्लॅन, मुलाच्या शिक्षणाकरिता असलेल्या योजना, गुंतवणूक योजना अशा विविध योजनाची माहिती दिली. तसेच बँकेचे व्यवहार ऑनलाईन झाले असून युनो ॲपचा जास्तीत जास्त वापर करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.