रोटरी क्लब आँफ मुंबई तर्फे उपजिल्हा रुग्णालय माणगांवला १०० डोळ्यांचे लेन्स भेट

38

रोटरी क्लब आँफ मुंबई तर्फे उपजिल्हा रुग्णालय माणगांवला १०० डोळ्यांचे लेन्स भेट

✍️निखिल सुतार ✍️
माणगांव तालुका प्रतिनिधी
📞 70839 05133📞

माणगांव : रोटरी क्लब आँफ मुंबई सेंट्रलच्या सहकार्याने क्लब अध्यक्ष सुरंगी मेहता, डॉ सुनील वसानी, संचालक सोनल गुप्ता आणि माणगांव तालुक्यातील मौजे शिरवली गावचे सुपुत्र संचालक दत्ताराम पांडुरंग शिंदे यांच्या माध्यमातून माणगांव उपजिल्हा रुग्णालयाकरिता दि. २६ फेब्रुवारी रोजी डोळ्यांच्या ऑपरेशनसाठी १०० अक्रिफोल्ड, १०० सर्जिकल ब्लेड, १०० आय ड्रॉप भेट देण्यात आले. तसेच या आधी २०२२ मध्ये अत्याधुनिक डोळ्याचे ऑपरेशन मशीन व ऑपरेशनसाठी सियाम मशीन रोटरी क्लब ऑफ मुंबई च्या मार्फत करण्यात आले असून तालुक्यातील अनेक रुग्णांना याचा मोठा फायदा होत असल्याचे डॉ. शंतानु डोईफोडे यांनी सांगितले. यावेळी रोटरी क्लब मुंबई सेंट्रल संचालक दत्ताराम शिंदे, डॉ. शंतनु डोईफोडे, सहायक अधीसेविका श्रीमती लता राठोड, इन्चार्ज सिस्टर शिवकांती गवळी, पत्रकार परेश शिंदे, वैभव सत्वे, कुमशेत सरपंच सचिन कदम, चेतना शिंदे, ताई कदम, इंदू गवस्कर, सुनंदा पातेरे आदी रुग्णालय कर्मचारी उपस्थित होते.
रोटरी क्लब आँफ मुंबई सेंट्रलचे सन्मानिय पदाधिकारी दत्ताराम शिंदे यांनी रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या नागरिकांच्या सुविधा करिता काही साधने उपलब्ध करून देता येतील याबाबत डॉक्टर यांचे कडून आढावा घेतला होता. या आधी २०० लेन्स उपजिल्हा रुग्णालयाला देण्यात आल्या होत्या. तसेच अजून ४०० लेन्स वर्षभरात उपजिल्हा रुग्णालयाला देण्यात येणार असल्याचे शिंदे यांनी यावेळी सांगितले. रोटरी क्लब ही संस्था महानगरी मुंबई शहरात कार्यरत आहे. क्लबचे प्रोजेक्ट चेअरमन दत्ताराम पांडुरंग शिंदे हे माणगांव तालुक्यातील मौजे शिरवली गावचे रहिवाशी आहेत. ग्रामीण भागात शैक्षणिक व सरकारी रुग्णालयात आवश्यक असणारी साधन व्यवस्थांची त्यांना चांगली माहिती होती. या संस्थेच्या माध्यमातून ते आपल्या मातृभूमी असलेल्या तालुक्यातील सर्वसामान्य लोकांसाठी, विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक उपक्रम हाती घेवुन क्लबच्या सहकार्याने सेवाभावी काम करीत आहेत.