माणगाव खांदाड येथे अखंड हरिनाम सप्ताह व श्री ज्ञानेश्वरी ग्रंथाचे सामुदायिक पारायणाचे संपन्न.

38

माणगाव खांदाड येथे अखंड हरिनाम सप्ताह व श्री ज्ञानेश्वरी ग्रंथाचे सामुदायिक पारायणाचे संपन्न.

✍️निखिल सुतार ✍️
माणगांव तालुका प्रतिनिधी
📞 70839 05133📞

माणगांव: अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी ग्रंथाचे सामुदायिक पारायण चे आयोजन माणगाव सोनभैरव मंदिर खांदाड येथे सातत्याने दरवर्षी प्रमाणे हे ४४ वेवर्ष असून या वेळेस दिनांक २१ फेब्रुवारी ते २७ फेब्रुवारी पर्यंत
ग्रामस्थ मंडळ खांदाड व समस्त सद्गुरु सेवा परिवार यांनी केले होते. परमपूज्य श्री. सद्गुरू शंकर दगडे महाराज, आंदोरी जि.सातारा व परमपूज्य सद्गुरू श्री.पांडुरंग सुतार महाराज, व गुरुमाता सूनिती पांडुरंग सुतार महाड यांच्या कृपा आशीर्वादाने श्री ज्ञानेश्वरी ग्रंथाचे सामुदायिक पारायण आयोजित करण्यात आले होते. पारायणाचा शुभारंभ व कलश पूजन, विणा पुजन गुरुवर्य श्री.आजीव पांडुरंग सुतार यांच्या शुभहस्ते शुक्रवार दिनांक २१ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ वा. करण्यात आले. तसेच दैनंदिन कार्यक्रम सकाळी ५ वा. काकड आरती,तसेच सकाळी ८ ते १२ व दुपारी ३ ते ५ वा. श्री. ज्ञानेश्वरी ग्रंथाचे पारायण, सायंकाळी ५ ते ६ प्रवचन तसेच सायंकाळी ७ ते ८ हरिपाठ, व रात्री ९ ते ११ किर्तन व रात्री १२ ते ५ हरीजागार तसेच दिनांक २६ फेब्रुवारी सायंकाळी ४ वाजता श्री ज्ञानेश्वरी पारायणाची सांगता श्री सद्गुरू सेवा मंडळ माणगाव यांच्या शुभहस्ते. व दि.२७ मार्च रोजी सकाळी १० वा. दिंडी सोहळा सोनभैराव मंदिर ते खांदाड गाव असे फिरवण्यात आली. ११ वा. ह.भ. प श्री. संतोष पवार महाराज, बामणोली यांचे कीर्तन नंतर १ ते ३ महाप्रसाद असे आयोजन करण्यात आले.
या दिंडी सोहळ्यास माजी नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार,दत्तात्रेय शिंदे,अशोक माने, भाऊ पांडे, कनोजे आण्णा, , मारुती पवार, सचिन कुलकर्णी, पांडुरंग पवार, पांडुरंग सुतार, आप्पा गायकवाड, शरद सुतार,किरण जाधव ,दत्ताराम पोवार, राम पोवार, संतोष माने, पोलीस पाटील नथुराम पोवार, काशिराम पोवार, अनंता पोवार, दत्तात्रेय जाधव, राजाराम जाधव, अशोक अंबुर्ले, महादेव तेटगुरे, नंदू सुतार, संतोष मांजरे, संतोष मोरे ,संपन्न घरवे , कृष्णा दिवेकर , तसेच लहान बालके व महिला मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सप्त्यास ७ दिवस लोकांकडून वाढता उत्साह निर्माण झाला होता व भक्ती भावनेत हा सप्ताह पार पडला या कार्यक्रमास ग्रामस्थ मंडळ खांदाड व समस्त सद्गुरु सेवा परिवार यांनी चांगल्या प्रकारे मेहेनत घेऊन हा कार्यक्रम यशस्वी पार पडला.