गुरुकुल प्री प्रायमरी स्कूल मध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबीर संपन्न
✍️लुकेश कुकडकर✍️
गडचिरोली तालुका प्रतिनिधी
मो. 8999904994
गडचिरोली:- चामोशी रोड गडचिरोली येथील गुरुकुल प्री प्रायमरी स्कूल मध्ये 1 मार्च रोजी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. गडचिरोली येथील प्रसिद्ध सिटी हॉस्पिटल चे संचालक डॉ. यशवंत दुर्गे शिबिरासाठी आले होते. यामध्ये सर्व विद्यार्थांचे आरोग्य तपासणी करण्यात आली.
पालकांनी डॉ. दुर्गे यांच्याशी संवाद साधून आपल्या पाल्यांच्या आरोग्याबद्दल माहिती जाणून घेतली. यावेळी गुरुकुल शाळेच्या प्राचार्या रेणुका गव्हारे यांनी चांगले आयुष्य जगणे हा प्रत्येकाचा अधिकार आहे आपल्या मुलांचे आरोग्य चांगले असेल तर आई-वडिलांचेही आरोग्य चांगले राहते असे विचार मांडले. कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्याकरिता शिक्षिका शिल्पा राऊत, वर्षा मेश्राम, श्रद्धा झिलपे यांनी सहकार्य केले.