अवैध पार्किंग मुळे होतोय वाहतुकीवर परिणाम, रहिवाशांना होतोय वाहतूक कोंडीचा नाहक त्रास.

अवैध पार्किंग मुळे होतोय वाहतुकीवर परिणाम, रहिवाशांना होतोय वाहतूक कोंडीचा नाहक त्रास.

✍️ पप्पू वि. नायर ✍️
मुंबई शहर प्रतिनिधी
मो :- 7304654862

मुंबई :- मालाड पश्चिम मधे इनबॉरबीट मॉल च्या मागे शॉपर्स स्टॉप समोर अवैध पार्किंग मुळे तिथल्या रहिवाशांना नाहक त्रास सहन करावे लागत आहे. कारण असे आहे कि काही दिवसात तिथल्या रस्त्याचे सिमेंट काँकरीट चे काम फक्त एकाच लेन चे झाले आहे, व दुसऱ्या लेन चे काम अजून बाकी आहे. सध्याचे दुसऱ्या लेन चे काम थांबवून कॉन्ट्रॅक्टर ने दुसऱ्या बाजूच्या बाजूच्या रस्त्याचे काम चालू केल्याने, पहिला रस्ता जो एक लेन झाला आहे, तो वाहतुकीस खुला करण्यात आला असून, तो अवैध पार्किंग दोन्ही बाजूने वाहने उभी केलेली दिसून येते. त्यामुळे वाहतुकीस एकच लेन मिळत असल्याचे पहावयास मिळते.

सदर वाहने शॉपर शॉप च्या कर्मचाऱ्यांची असून, बाकीचे वाहने तिथल्या विभ्योगर इंग्लिश शाळेच्या बसेस यांचा समावेश असतो, सध्या रस्त्याचे काम चालू असल्याने तिथे नो पार्किंग चा बोर्ड सुद्धा बसवला आहे. तरी सुद्धा नियमांची पायमल्ली करून सर्रास वाहने पार्किंग केली जात आहेत. याचा परिणाम तिथल्या स्थानिक रहिवाशांना बसत असल्याने
त्यांना तिथून रहदारी करण्याने वाहतूक कोंडीने जास्त वेळ लागतो असे निदर्शनास आले असून, तिथे वाहतूक पोलीस शाखेची टोविंग व्हॅन आणून तिथे असणाऱ्या मोटर सायकल, कार, बस यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी तेथील स्थानिक नागरिक करत आहेत.