रायगडात महास्वच्छता अभियान

रायगडात महास्वच्छता अभियान

डॉ. नानासाहेब धार्माधिकारी यांना स्वच्छतेतून अभिवादन

रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३

अलिबाग:- महाराष्ट्र भूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जयंतीनिमित्त डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा यांच्यावतीने पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी व डॉ. सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी (दि.2) महास्वच्छता अभियान राबविण्यात आले.

यावेळी रायगड जिल्ह्यातील विविध शहरांमधील सरकारी कार्यालयांचे परिसर आणि प्रमुख रस्ते तसेच शहराला जोडणार्‍या रस्त्यांची साफसफाई करण्यात आली. हे अभियान सकाळी सात ते बारा वाजेपर्यंत राबविण्यात आले. या स्वच्छता अभियानाला हजारो श्री सदस्यांसह विविध क्षेत्रातील अधिकारी व कर्मचार्‍यांनी उत्स्फुर्तपणे सहभाग घेतला. यावेळी जिल्हाभरातुन हजारो टन कचरा संकलित करण्यात आला व त्याची योग्य ती विल्हेवाट करण्यात आली.