पंचमुखी हनुमान मंदिरात आ. किशोर जोरगेवार यांच्या हस्ते हायमस्ट लाईटचे उदघाटन सोहळा संपन्न

पंचमुखी हनुमान मंदिरात आ. किशोर जोरगेवार यांच्या हस्ते हायमस्ट लाईटचे उदघाटन सोहळा संपन्न

साहिल सैय्यद /प्रतिनिधि
📲9307948197

घुग्घूस : चंद्रपूर जिल्ह्यातील जागृत देवस्थान असलेले श्री क्षेत्र पांढरकवडा येथील पंचमुखी हनुमान मंदिर देवस्थान मंदिरात दर्शना करीता दररोज मोठया संख्येने भक्तगण येत असतात.
याठिकाणी लग्न, नवस असे अनेक शुभकार्य होत असतात.
परिसरात अंधार राहत असल्यामुळे भक्तजणांना होत असलेला त्रास लक्षात घेऊन चंद्रपूर विधानसभेचे लोकप्रिय आमदार किशोर जोरगेवार यांच्या प्रयत्नातुन मंदिरात हायमस्ट लाईंट लावण्यात आले

दिनांक 01 मार्च 2025 रोजी चंद्रपूर आ.किशोर जोरगेवार यांच्या हस्ते हायमस्ट लाईटचे उदघाटन लोकार्पण करण्यात आले याप्रसंगी पंडित अमित देशपांडे,उप – प्राचार्य संजय बेले, माजी नगरसेविका छबूताई वैरागडे,मंदिर व्यवस्थापन समितीचे लक्ष्मण सादलावार, कुकडे भाऊ, पांढरकवडा माजी सरपंच सूरज तोतडे, नामदेव डाहुले, संजय तिवारी,इमरान खान, सामाजिक कार्यकर्ते सोनल भरडकर,माजी सरपंच संतोष नुने,अनूप भंडारी मयूर कलवल राजेश मोरपाका, मुन्ना लोढे, स्वप्नील वाढई, रोहन पौगुला विशाल दामेर नवीन मोरे विक्की लिंगमपेल्ली व अन्य सन्माननीय नागरिकगन उपस्तिथ होते