A statement was issued on behalf of Shiv Sena for various demands of the citizens.
A statement was issued on behalf of Shiv Sena for various demands of the citizens.

शिवसेनेच्या वतिने नागरीकांच्या विविध मागण्या करिता निवेदन देण्यात आले.

 A statement was issued on behalf of Shiv Sena for various demands of the citizens.
प्रशांत जगताप

हिंगणघाट:- आज दिनांक 3 फेब्रुवारी मंगळवार ला हिंगणघाट तालूक्यातील शिवसेना कार्यकर्ते आणी नेत्यांनी हिंगणघाटचे तहसीलदार श्रीराम मुदडा मार्फत महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांना निवेदन दिले.

मौजा भगवा (ग्रा.पं.चाणकी) येथील वनविभागाच्या जागेवर असनारा नाथजोगी लोकांच्या जागेचा प्रश्नन निकाली काढणे संदर्भात आणि पंचायत समिती मोझरी विभागातील भैय्यापूर, खानगांव, कोसुर्ला (मो) व मोझरी या गांवातील नागरीकांना प्रधानमंत्री आवास 2022 सर्वासाठी घरे योजनेमधुन नागरीकांना जमिन पट्टे मिळणे आणी विविध मागण्या करिता निवेदन देण्यात आले.

संजय राठोड साहेब, वनमंत्री महाराष्ट्र राज्य यांना भगवा चाणकी येथिल कुटुंबाना हक्काची घरे मिळण्याकरीता वनविभागाच्या जागेवर पट्टे देण्यात यावी या करीता दिनांक 3 फेब्रुवारी मंगळवारला निवेदन देण्यात आले. त्यावर तहसिल कार्यालयाच्या तर्फे या प्रकरणा बाबत काय कार्यवाही करण्यात आली आहे. या बाबत माहिती देण्यात यावी. तसेच मौजा भगवा (चाणकी) ता. हिंगणघाट जि. वर्धा येथील नागरिकांना वनविभागाची जागा देण्याबाबत तसेच व मोझरी विभागातील भैय्यापूर ,खानगांव,कोसुर्ला (मो.) व रोहणखेडा या गांवातील अतिक्रमण धारकांना सर्वासाठी घरे योजनेमधुन घरकुलाचा लाभ मिळण्याकरीता जमिण पट्टे देण्यात यावे याबद्दल निवेदन देण्यात आले आहे.

यावेळी निवेदन देते वेळी शिवसेनेचे पंचायत समिती हिंगणघाट उपसभापती अमोलभाऊ गायकवाड, युवासेना तालुका प्रमुख नीखील वाघ, अंबादासजी खानजोडे, सुधिर कवडकार, दिलीप पवार, शंकर शिंदे, झाडे काकाजी, भक्तराज शिंदे, विलास शिंदे, रामकृष्ण चव्हाण, रुपेश शिंदे, कुंडलिक शिंदे, अनिल चव्हाण, तानाजी शिंदे, उत्तमराव फुकट इत्यादी नागरिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here