कोलाड मध्ये धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज बलिदान मास सुरू..

कोलाड मध्ये धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज बलिदान मास सुरू..

✍️तेजपाल जैन ✍️
कोलाड प्रतिनिधी
📞8928847695📞

कोलाड : सकळ हिंदू समाज कोलाड पंचक्रोशी व श्री शिवप्रतिष्ठा हिंदुस्तान तर्फे शुक्रवार दिनांक २८ फेब्रुवारी पासून बलिदान मास सुरू झालेला आहे सायंकाळी ७ वाजता श्री अंबर सावत महाराज मंदिर येथे धर्मवीर संभाजी महाराजांचे पूजन करून धर्मवीर बलिदान मासाला प्रारंभ झाला. फाल्गुन शुद्ध प्रतिपदा ते फाल्गुन अमावस्या (२८ फेब्रुवार ते २९ मार्च) दरम्यान बलिदान मास पाळण्यात येणार आहे. रोज सायंकाळी ७ वाजता संभाजी सूर्योदय श्लोक, प्रेरणा मंत्र , ध्येय मंत्र म्हणून संभाजी महाराजांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे. धर्मवीर संभाजी महाराजांचे बलिदान समस्त हिंदू धर्मासाठी आहे. याची जाणीव ठेवून प्रत्येक हिंदू व्यक्तीने धर्मवीर बलिदान मासचे नित्य आचरण काटेकोरपणे करावे. असे आव्हान सकल हिंदू समाज कोलाड पंचक्रोशी व श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान तर्फे करण्यात येत आहे तसेच मोठ्या संख्येने भाविक श्री अंबर सावंत महाराज मंदिरात येत आहे