नागपूर महानगरपालिकेच्या समाज विकास विभागाद्वारे
महिला उद्योजिका मेळाव्याचे आयोजन
✍🏻मंजुषा सहारे ✍🏻
नागपूर शहर प्रतिनिधी
मो 9373959098
नागपूर :- सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे की नागपूर महानगरपालिकेच्या समाज विकास विभागाद्वारे शहरातील महिला उद्योजिका, बचत गटातील महिलांच्या कौशल्याला वाव मिळवून देण्याच्या हेतूने आयोजित महिला उद्योजिका मेळाव्याचे बुधवारी ५ मार्च रोजी २०२५ रोजी रेशीमबाग येथे विभागीय आयुक्त श्रीमती माधवी खोडे यांच्या हस्ते उद्घाटन झाले.
प्रमुख अतिथी म्हणून मनपा आयुक्त व प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी, अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल, उपायुक्त डॉ. रंजना लाडे, सहायक संचालक नगर रचना श्री. ऋतुराज जाधव, जनसंपर्क अधिकारी श्री. मनीष सोनी उपस्थित होते.