जिल्हा स्तरीय मिनी सरस – विक्री व प्रदर्शन कार्यक्रमाचे 6 ते 10 मार्च ला आयोजन

जिल्हा स्तरीय मिनी सरस – विक्री व प्रदर्शन कार्यक्रमाचे 6 ते 10 मार्च ला आयोजन

✍️लुकेश कुकडकर✍️
गडचिरोली तालुका प्रतिनिधी
मो.8999904994

गडचिरोली :- उमेद- महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान गडचिरोली अंतर्गत जिल्हा स्तरीय मिनी सरस – विक्री व प्रदर्शन कार्यक्रम ०६ मार्च ते १० मार्च २०२५ रोजीपर्यंत अभिनव लॉन, चंद्रपूर रोड, गडचिरोलीचे मैदानामध्ये आयोजित करण्यात आलेली आहे. सदर प्रदर्शनीसाठी जिल्हयातील ७५ स्वयं सहाय्यता समुह सहभागी होणार आहेत.

प्रदर्शनीमध्ये मध, जांभूळ व सिताफळ प्रक्रिया करून त्याचे वेगवेगळे पदार्थ तसेच मोहाचे वेगवेगळे पदार्थ, लाकडी शोभेच्या वस्तू, आंब्यापासून तयार करण्यात येणारे पदार्थ, मच्छी लोंचे यांचा समावेश असणार आहे.

प्रदर्शनी दरम्यान ग्रामीण भागातील अस्सल गावरान पध्दतीच्या विविध पदार्थाची चव चाखायला मिळणार आहे. या शिवाय लाकडी वस्तू, दागिने, ड्रेस मटेरिअल, घरगुती मसाले, गावरान दाळी, कुरडया, पापड्या, आंबा लोनचे, मच्छी लोनचे, व्हेज नॉव्हेज जेवणाची दुकाने लावण्यात येणार आहे. भजी- भाकरी, पुरणपोळी, ज्वारी भाकरी, भरीत भाकरी, चिकन भाकरी, इडली, अप्पे, साबुदाना वडे, मोहाचे विविध पदार्थ असे अनेक भोजन व नास्त्याचे स्टॉल लावण्यात येणार असून जिल्हावासीयांना जास्तीत जास्त संख्येने ०६ ते १० मार्च २०२५ दरम्यान प्रदर्शनीला भेट देण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

तसेच दररोज रात्री ७ वाजता सांस्कृतीक मेजवाणी यामध्ये लोक संगीत, महिलांचे डान्स, आदिवासी संस्कृती दर्शन कार्यक्रम, अधिकारी कर्मचाऱ्यांचे डान्स असे विवीध मनोरंजनाचे कार्यक्रम घेण्यात येत आहे.

वस्तूंची खरेदी करुन महिलांना प्रोत्साहन दयावे –

ग्रामीण भागातील महिलांनी बचत गटांच्या माध्यमातुन उत्पादित केलेल्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध होण्यासाठी मिनी सरस प्रदर्शन व विक्री ०६ ते १० मार्च २०२५ पर्यत आयोजन करण्यात आलेले आहे. सर्वानी भेट देवून महिलांना प्रोत्साहन दयावे.- राजेंद्र एम. भुयार, जिल्हा अभियान सहसंचालक महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान तथा प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, गडचिरोली