रायगड जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेचे धरणे आंदोलन…
✍️सचिन पवार ✍️
कोकण ब्युरो चीफ
📞8080092301📞
माणगांव :-आज दिनांक ६/०३/ २०२५ रोजी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना तालुका शाखा माणगाव तथा राज्य सरकारी निमसरकारी जिल्हा परिषद कर्मचारी, शिक्षक व शिक्षकेतर नगरपालिका नगरपरिषद ग्रामपंचायत कर्मचारी महिला परीचर व कंत्राटी कर्मचारी समन्वय समिती तालुका शाखा माणगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना माणगाव तालुक्याचे तहसीलदार आदरणीय श्री दशरथ काळे साहेब यांच्यामार्फत कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या संदर्भात निवेदन देण्यात आले सदर निवेदन देण्याकरिता माणगाव तालुक्यातील सर्व राज्य शासकीय निमशासकीय कर्मचारी यांनी सकाळी १० ते १२ वाजण्याच्या सुमारास धरणे आंदोलन करून घोषणा देत निवेदन सादर केले. सदर प्रसंगी मध्यवर्ती संघटनेचे तालुकाध्यक्ष श्री राजेंद्र खाडे, सरचिटणीस श्री,आर. ए. दाढेल साहेब, समन्वय समितीच्या तालुकाध्यक्ष श्रीमती विनय जाधव तथा रायगड जिल्हा कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रा. श्री भानुदास बिरादार ,प्रा.संभाजी भोसले, प्रा.चंद्रकांत अधिकारी , प्रा.मोहन शेडगे , प्रा.विकास पाटील,प्राथमिक शिक्षण विभागाच्या कार्यालयातील श्रीमती सोंडकर मॅडम, श्रीमती मोहीते मॅडम श्री पवार साहेब,तथा महसूल संघटनेचे श्री.शाम खोपकर, श्री कोदे , श्री पांगारे श्री मुकणे श्री उतेकर श्री तुषार सुर्वे श्री जाधव साहेब तथा तलाठी संघटनेच्या तालुका अध्यक्षा श्रीमती. प्रियंका सतेरे, तलाठी कु.हर्षली दहीफळे व मंडळ अधिकारी श्री.ज्योत्सना शिंदे, श्री के.एन पाटील श्री. विश्वास गडदे,श्रीमती वैशाली सतवे श्रीमती मंजू जाधव इत्यादी पदाधिकारी तथा संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते.