फ्रेंड्स ग्रुप च्या हॉलिबॉल स्पर्धेत मॉडेल संघ रांजणखार विजेता

फ्रेंड्स ग्रुप च्या हॉलिबॉल स्पर्धेत मॉडेल संघ रांजणखार विजेता

सतत तीन वर्षे विजेतेपद मिळऊन विजयाची हॅट्रिक
रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग :- फ्रेंड्स ग्रुप रांजणकर यांच्या आयोजनाने शूटिंग बॉल स्पर्धा नुकताच संपन्न झाल्या. स्पर्धांमध्ये 16 नामांकित संघाने भाग घेतला होता. रायगड ठाणा मुंबई उरण सिंधुदुर्ग या जिल्ह्यातून नामांकित संघ दाखल झाले होते.या स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मॉडेल संघ रांजणखार या संघाने जिंकले आहे. सतत तीन वर्ष फायनल मारून या संघाने आपला दबदबा कायम ठेवला आहे. मॉडेल संघाचे राजेश पाटील, परेश पाटील, निहाल म्हात्रे यांना फ्रेंड्स ग्रुप कडून वैयक्तिक पारितोषिके देऊन त्यांच्या क्रीडा कौशल्याचे कौतुक करण्यात आले. विद्युत मांडवकर संघ द्वितीय क्रमांकावर राहिला. बीपीटी मुंबई संघ तृतीय क्रमांक तर सिंधुदुर्ग संघाला चतुर्थ क्रमांकावर समाधान मानावे लागले.
रायगड जिल्हा शूटिंग बॉल चे अध्यक्ष शंकर मोकल, दिलीप उर्फ छोटम शेठ भोईर यांची उपस्थिती प्रार्थनीय होती. फ्रेंड्स ग्रुपचे प्रतीक म्हात्रे, स्वप्निल पाटील, सनी म्हात्रे ,शंकर मोकल,बालनाथ मोकल यांनी खूप परिश्रम घेऊन अतिशय उत्तम क्रीडांगण बनवले होते. रात्रीच्या वेळी प्रेक्षकांसहित सर्व क्रीडापटू आणि नियोजकांना स्नेहभजनाची व्यवस्था केली होती. समालोचन, सूत्रसंचालन, अंपायर, लाईनमन, संघाचे व्यवस्थापक यांनी आपली कामगिरी चोख बजावली व स्पर्धा संपन्न झाली.