वर्षभर काम करत रहा पण, रहदारी साठी एक लेन खुली करा, रहिवाशांची मांगणी.

वर्षभर काम करत रहा पण, रहदारी साठी एक लेन खुली करा, रहिवाशांची मांगणी.

✍️ पप्पू वि. नायर ✍️
मुंबई शहर प्रतिनिधी
मो :- 7304654862

मुंबई :- वर्ष उजाडत आला तरी गोरेगांव प्रेम नगरच्या नाल्याच्या पुलाचे काम अद्याप पूर्ण होताना काही दिसत नाही, रहिवाशांचा अत्यंत महत्वाचा मानला जाणारा रस्ता बंद असल्या मुळे तिथल्या स्थानिक रहिवाशांना दररोज उलट प्रवास करावं लागत आहे, त्यामध्ये त्यांचे वेळ व पैसे जास्त प्रमाणात खर्च होतात. हा रस्ता गोरेगांव पश्चिम मधून येऊन प्रेम नगर वरून वासरी हिल रोड ला कनेक्ट होतो, व तिथून मालाड पश्चिम ते मुलुंड लिंक रोड वरून वेस्टर्न हायवे ला बाहेर पडतो, पण सध्या रस्ता बंद असल्या मुळे नागरिकांना मालाड लिंक रोड व एस व्ही रोड चा मार्ग अवलंबवा लागतो, त्यात त्यांचे पैसे व वेळ जास्त खर्च होते.

एवढ्या वाहतुकीचा रस्ता असून मुंबई महापालिकेला त्याच काही घेणे देणे नाही असं चित्र सध्या तिथल्या रहिवाशांना पाहायला मिळत आहे, कारण तिथल्या ठेकेदाराला कोणत्याही प्रकारचे महापालिकेचे निर्देश नसल्याचे दिसते. म्हणून ठेकेदाराकडून कामात दिरंगाई करताना दिसून येते, वर्ष उजाडत आला तरी काम अजून अर्धवट झाल्याचे दिसून आले आहे.

आता तिथल्या स्थानिक रहिवाशांचा राग अनावर होत असून, सध्या त्या पुलावरून एक लेन चालू करावी व रिक्शा, मोटर सायकल तेथून जाऊ शकतील एवढा रस्ता खुला करून दयावा, व बाकीचे काम ठेकेदाराच्या हिशोबाने चालत राहावे, अशी मांगणी तेथील रहिवाशांची होत आहे, तरी महापालिकेने लक्ष घालून एक लेन चालू करावा अशी विनंती स्थानिक रहिवाशी करत आहेत.