मॅजिक बस इंडिया फाउंडेशन अंतर्गत जागतिक महिला दिवस साजरा

मॅजिक बस इंडिया फाउंडेशन अंतर्गत जागतिक महिला दिवस साजरा

✍️लुकेश कुकडकर✍️
गडचिरोली तालुका प्रतिनिधी
मो. 8999904994

गडचिरोली :- ८ मार्च २०२५ ला शनिवारला मॅजिक बस इंडिया फाउंडेशन च्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिला दिवस हा मोठ्या उत्साहाने चामोर्शी तालुक्यामध्ये साजरा करण्यात आला त्यामध्ये मॅजिक बस इंडिया फाउंडेशन तर्फे महिलांसाठी वेगवेगळ्या खेळाचे आयोजन करण्यात आले त्यामध्ये महिलांसाठी लगोरी रस्सीखेच स्पर्धा वेगवेगळ्या महिलांवरती पोस्टर मेकिंग स्पर्धा व तसेच आरोग्यावरती आरोग्य तपासणी तथा आरोग्य शिबिर सुद्धा घेण्यात आले.

जागतिक महिला दिवस हा ८ मार्चला का साजरा करण्यात येतो व त्याचे काय महत्त्व आहे त्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी महिलांना सांगून महिलांमध्ये नवीन ऊर्जा येऊन महिला स्वतःच्या अधिकाऱ्याविषयी जागरूक होतील तसेच महिला स्त्री सक्षमीकरण कडे कशी वडेल याकडे लक्ष देईल या उद्देशाने जागतिक महिला दिवस चामोर्शी तालुक्यातील सगनापूर, घारगाव, गणपुर सुभाषग्राम, मकेपल्ली, आमगाव, गौरीपूर मालेरमाल इत्यादी गावामध्ये साजरा करण्यात आला व चामोर्शी तालुक्यातील वेगवेगळ्या गावातील महिलांनी उत्स्फूर्तपणे ८ मार्च जागतिक महिला दिवस साजरा करण्यासाठी सहभाग दर्शविला या कार्यक्रमाचे आयोजन युवा मार्गदर्शक हर्षाली खारकर, भीमराव शंभरकर, राजेश्वर माडेमावार, पल्लवी झरकर, सोनाली रणदिवे, पंकज शंभरकर धीरज अलोने यांच्या अथक प्रयत्नाने संपन्न झाला जागतिक महिला दिवस साजरा करण्यासाठी तालुक्यातील तालुका समन्वयक योगिता सातपुते दिनेश कामतवार यांनी विशेष सहकार्य केले.
वरील संपूर्ण कार्यक्रम मॅजिक बस इंडिया फाउंडेशन चे जिल्हा कार्यक्रमाधिकारी प्रशांत लोखंडे सर यांच्या मार्गदर्शनात संपन्न झाला.