केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी व श्रीमती अमृता फडणवीस यांच्या हस्ते कर्तृत्वान महिलांना गौरवान्वित
✍🏻मंजुषा सहारे ✍🏻
नागपूर शहर प्रतिनिधी
मो.9373959098
नागपूर :- सविस्तर वृत्त पुढील प्रमाणे आहे की नागपूर च्या महिला उद्योजिका मेळाव्यामध्ये शनिवारी केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी व श्रीमती अमृता फडणवीस यांच्या हस्ते कर्तृत्वान महिलांना गौरवान्वित करण्यात आले. डॉ. सुषमा देशमुख, साची जीवने, जोया सिराज शेख, अरुणा कोहाड, प्रमिला राऊत, निर्मला अंजीकर, सुनीता मेश्राम, शोभाबाई सोनटक्के, सुरभी जयस्वाल या विविध क्षेत्रात आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटविणाऱ्या महिलांना मान्यवरांनी मनपाचा मानाचा दुपट्टा, प्रमाणपत्र आणि स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित केले.
याप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे महिला कार्यकर्ते व नागपुरातील बहुतांश महिलांनी आपापली उपस्थिती लावून कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडले.