घुग्घुस येथे ‘सन्मान स्त्री शक्ती’ चा कार्यक्रम उत्साह साजरा
स्त्री शक्तीला आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे हे अंतिम लक्ष : विवेक बोढे
साहिल सैय्यद /प्रतिनिधि
📲9307948197
घुग्घुस: येथील भाजपा महिला आघाडीतर्फे ८ मार्च रोजी सकाळी १२ वाजता प्रयास सभागृह केमिकल वार्ड क्रमांक ६ येथे जागतिक महिला दिनानिमित्त ‘सन्मान स्त्री शक्ती’ चा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून, भाजपाचे जिल्हा महामंत्री विवेक बोढे, प्रयास सखी मंचच्या मार्गदर्शिका अर्चना भोंगळे, वनविभागाचे अधिकारी ए. डी. मल्लेलवार, हस्तकलेचे पर्यवेक्षक किशोर गायकवाड, सौदागर लाटकर, आरोग्य सेविका कांचन चंदनखेडे, समाजसेविका सरस्वती पाटील, ग्रामपंचायतच्या माजी सदस्या वैशाली ढवस, नंदा कांबळे, कुसुम सातपुते, अमीना बेगम, नाजमा कुरेशी मंचावर उपस्थित होते.
प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्जवलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. प्रमुख पाहुण्यांचे स्वागत शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले. कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
मनोगत व्यक्त करतांना भाजपाचे जिल्हा महामंत्री विवेक बोढे म्हणाले, आज स्त्री शक्ती सक्षम होत आहे नेतृत्व करीत आहे प्रेरणा देत आहे. आर्थिकदृष्ट्या महिला सक्षम झाल्या पाहिजे महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्यास समाजाच्या मानसिकतेत आणि कुटुंबातील तिच्या स्थानात बदल होतो. महिलांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याच्या दिशेने वाटचाल करणे आवश्यक आहे.
याप्रसंगी क्रीडा, नृत्य, बांबू प्रशिक्षण घेणाऱ्या स्त्री शक्तीचा, किट्टी ब्युटी डान्स ग्रुप, आरोग्य सेविका कांचन चंदनखेडे यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, सन्मानचिन्ह व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. नृत्य, गीत गायन असे विविध कार्यक्रम घेण्यात आले.
संचालन विना बांगडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रयास सखी मंचच्या अध्यक्षा किरण बोढे, सरिता इसारप, सौंदर्या तांड्रा, शारदा गोडसेलवार, पुष्पा रामटेके, सिमा पारखी, सारिका भोंगळे, बेबी चिंचोलकर, सुनंदा लिहीतकर, आबेदा पठाण, सुरेखा डाखरे, पुनम मस्ते, निरंजना कोत्तूर, चंद्रकला मन्ने, नलिनी पिंपळकर, अर्चना चटकी, विना घोरपडे, लता कदम, अर्चना पोईणकर, शालिनी डांगे, वंदना मुळेवार, जयश्री चुने, कीर्ती पडवेकर, मनीषा ढवस, अर्चना पाझारे यांनी प्रयत्न केले.
कार्यक्रमाला मोठया संख्येत महिला उपस्थित होत्या.
