गडमौशी येथे आंतरराष्ट्रीय महिला दिन उत्साहात साजरा

गडमौशी येथे आंतरराष्ट्रीय महिला दिन उत्साहात साजरा

जितेंद्र नागदेवते
सिंदेवाही तालुका प्रतिनिधी
8806689909

सिंदेवाही :- राष्ट्रीय महिला दिनानिमित्त ग्रामपंचायत गडमौशीच्या वतीने विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते . त्यामध्ये महिला सक्षमीकरणाविषयी जागरूक करण्याकरीता त्यांना मार्गदर्शन करण्यात आले. आंतर राष्ट्रीय महिला दिनाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष रूपाली रत्नावार सरपंच मुरमाडी तसेच उपाध्यक्ष म्हणून गडमौशी ग्रामपंचायत सरपंच सोनाली संदीप पेंदाम सरपंच तसेच प्रमुख पाहुणे म्हणून गडमौशी ग्रामपंचायत मधील पोलीस पाटील प्रमिला सुहास मंडलवार तसेच प्रमुख पाहुणे उपसरपंच पुजा अल्लमवार, मुख्याध्यापक नंदनवार मॅडम, ग्रामपंचायत सचिव इच्छा मुन या उपस्थित होते.
राष्ट्रीय महिला दिनानिमित्त ग्रामपंचायत येथे मोठय़ा प्रमाणावर अंगणवाडी सेविका तसेच महिला उपस्थित होत्या. या निमीत्ताने विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. महिला सक्षमीकरणाविषयी जागरूक करण्याकरीता विविध स्तरावरील महिलांनी केलेल्या योगदानाचे दाखले दिले यातुन इतर महिलांनी बोध घेऊन आपली व समाजाची उन्नती करावी असे मार्गदर्शन भाषणात सरपंच सोनाली पेंदाम यानी केली.
यानिमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले व त्यानंतर मसाले भात वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पोलीस पाटील प्रमिला मंडलवार तर आभार प्रदर्शन सोनाली पेंदाम यांनी केले.