योग्य दर्जाचा गहू – तांदूळ पुरवठा करा – रुपेश वलके
✍️लुकेश कुकडकर✍️
गडचिरोली तालुका प्रतिनिधी
मो 8999904994
गडचिरोली :- रास्त दुकानात पाठविला जाणारा गहू – तांदुळाची गुणवत्ता एकदम खराब असल्याचा आरोप रास्त दुकानदार तथा जिल्हा कार्यकारी कार्याध्यक्ष रास्त भाव दुकानदार संघटना गडचिरोलीचे रुपेश वलके यांनी केले आहे.
सीएमआर पद्धतीने येणाऱ्या गहू तांदुळाची गुणवत्ता एकदम खराब असताना सुद्धा सीएमआर पद्धतीने मंजूर कसा होता असा सवाल त्यांनी केला आहे.
दुकानात गुणवत्ता तपासून न पाठवता खराब धान्य दुकानदारांच्या माथी मारल्या जाते. त्यामुळे गरीब गरजू लोकांना खराब धान्य कसा वाटप करावा असा प्रश्न निर्माण होतो. तसेच दुकानात येणाऱ्या धान्या चा कट्टा मोजून देण्यात यावा, फाटके कट्टे जागेत शिवून अथवा बदलवून देण्यात यावा.
पोस मशीन मधून निघणाऱ्या चिट्ठी वर शासन रेट गहू 28.5 रु. तर तांदूळ 40.42रु. आहे त्यामुळे त्याची गुणवत्ता पण तशीच पाठवावी. असे त्यांचे मत आहे.
