नव्या राज्य सरकारचा पहिला अर्थसंकल्प रोजगाराभिमुख व सर्वसमावेशक : डॉ. अशोक जीवतोडे

नव्या राज्य सरकारचा पहिला अर्थसंकल्प रोजगाराभिमुख व सर्वसमावेशक : डॉ. अशोक जीवतोडे

🖋️ मीडिया वार्ता वृत्तसेवा
📱 8830857351

चंद्रपूर : 10 मार्च
माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली अर्थमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून आज १० मार्च ला माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वातील नविन सरकारचा महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प हा आगामी काळात ७१ लाख ७ हजार ५०० रोजगार देण्याचा संकल्प असलेला अर्थसंकल्प असल्याने तो रोजगाराभिमुख अर्थसंकल्प असल्याचे भारतीय जनता पक्ष ओबीसी मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष डॉ. अशोक जीवतोडे यांनी म्हटले आहे.

सर्व घटकांना सोबत घेऊन चालणारा हा सर्वसमावेशक अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पात भौतिक संसाधनांसोबत नागरिकांच्या उन्नतीचा सर्वांगीण विचार करण्यात आलेला आहे. एकूणच राज्याला पुढील काळात नविन दिशा देणारा व विकसित महाराष्ट्राकडे नेणारा हा अर्थसंकल्प असल्याचे भारतीय जनता पक्ष ओबीसी मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष डॉ. अशोक जीवतोडे यांनी पुढे म्हटले आहे.

या अर्थसंकल्पात मायक्रोसॉफ्ट तर्फे महिलांना प्रशिक्षण, गडचिरोली रोड साठी ५०० कोटींची तरतूद, गोसेखुर्द प्रकल्पाला २०२५ पर्यंत पूर्ण करणार, कौशल्य रोजगारांसाठी ८०७ कोटींची तरतूद, रस्ते विकासाठीची कामे विकासपथावर तथा भरीव तरतूद, नैसर्गिक शेती अभियानासाठी २५५ कोटींची तरतूद, कृषिक्षेत्रासाठी एआय धोरण राबविणार, ग्रामपंचायत स्तरावर स्वयंचलित हवामान केंद्र उभारणार, नविन गृहनिर्माण धोरण राबविणार, आदिवासी विकासासाठी भरीव तरतूद, एक तालुका एक बाजार समिती धोरण राबविणार, लाडकी बहीण योजनेसाठी ३६ हजार कोटींची तरतूद, २४ लाख महिलांना लखपती दीदी करण्याचं लक्ष, बचत गटांना हक्काची बाजारपेठ त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात मॉल उभारणार, ३ हजार हून अधिक गावे मुख्य रस्त्यांना जोडणार, ८८४०० कोटी रस्ते काँक्रीटीकरण उद्दिष्ट, शेतकऱ्यांना पीक विमा सल्ला, समृद्धी महामार्गाचा अखेरचा टप्पा काम पूर्णत्वाकडे, नदी व धरणातील गाळ उपसा, नदी जोड प्रकल्प, सर्व विभागांना न्याय देण्याचे प्रयत्न, राज्याची अर्थव्यवस्था १ ट्रिलियन डॉलर करण्याचे उद्दिष्ट, आदी कल्याणकारी भौतिक संसाधन व नागरिकांच्या उन्नतीचा सर्वांगीण विचार करणाऱ्या अनेक योजनांचा समावेश असल्याचे डॉ. अशोक जीवतोडे यांनी म्हटले आहे.