राष्ट्रवादीच्या महिला जिल्हा अध्यक्ष पदी डॉ. सोनल कोवे
✍️लुकेश कुकडकर✍️
गडचिरोली तालुका प्रतिनिधी
मो 8999904994
गडचिरोली :- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाच्या महिला जिल्हा अध्यक्ष पदी डॉ सोनल चेतन कोवे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा सौ रुपाली चाकणकर यांनी नियुक्तीपत्र दिले.
उपमुख्यमंत्री मा.ना.अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष मा.खा. सुनीलजी तटकरे व राष्ट्रीय कार्याध्यक्ष मा.खा. प्रफुल्लभाई पटेल यांना अभिप्रेत असणारी संघटना बांधण्यासाठी डॉ कोवे प्रयत्नशील राहतील. पक्षाच्या वाढीसाठी व पक्षाची ध्येय धोरणे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी पक्षाला आपले सहकार्य राहील असा विश्वास त्यांचा आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील डॉ. सोनल कोवे या हुशार, अभ्यासू तसेच महिलांच्या मदतीला धावून जाणाऱ्या असल्याने त्यांची राष्ट्रवादीच्या महिला जिल्ह्याध्यक्ष पदी नियुक्ती केल्याने जिल्ह्याच्या शहरी, ग्रामीण भागात त्यांचे अभिनंदन होत आहे.
