महाबोधी महाविहार मुक्तीसाठी सिंदेवाहीत साखळी उपोषण सुरू
सिंदेवाही तालुक्यातील सर्व बौद्ध समाज झाला सहभागी.
जितेंद्र नागदेवते
सिंदेवाही तालुका प्रतिनिधी
8806689909
सिंदेवाही :- बिहार मधील बुद्धगया येथील महाबोधी महाविहार अजूनही बौद्धांच्या ताब्यात नसून ते हिंदूंच्या ताब्यात असल्याने महाबोधी महाविहार मुक्तीसाठी देशात १२ फेब्रुवारी पासून जन आंदोलन सुरू झाले आहे. त्या अनुषंगाने त्यांचे समर्थनार्थ सिंदेवाही तालुक्यातील समस्त बौद्ध समाजाच्या वतीने ६ मार्च ते १२ मार्च पर्यंत सिंदेवाही येथील बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे चौक येथे साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे.
इ .स. पूर्व तिसऱ्या शतकात सम्राट अशोकाने भारतभर बुद्धवीहार निर्माण केले. दरम्यान बुद्धगया येथील महाबोधी महाविहार भारतासह जगभरातील बौद्धांचे तीर्थस्थान आहे. या महाबोधी महाविहाराचे व्यवस्थापन बौद्धांच्या ताब्यात नाही. ते बौद्धांच्याच ताब्यात असावे. यासाठी विविध बौद्ध संघटना , भिक्खू संघ, यांचे मार्फत आंदोलन सुरू झाले आहे. त्याच अनुषंगाने सिदेवाही तालुक्यातील सर्व बौद्ध समाजाच्या वतीने ६ मार्च ते १२ मार्च दरम्यान सकाळी 10 वाजता पासून ते दुसऱ्या दिवशी 10 वाजता पर्यंत साखळी उपोषण करण्यात येत आहे. मैत्रेय बुद्ध विहार समोर बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे चौक सिंदेवाही येथे सुरू झालेल्या साखळी उपोषणाची सुरवात तथागत गौतम बुद्ध आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिमांना अभिवादन करून करून करण्यात आले. कृती समितीचे वतीने जे टी मेश्राम सर यांचे अध्यक्षतेखाली मार्गदर्शन घेण्यात आले. यावेळी प्रा . नगराळे, भारतीय बौद्ध महासभा जिल्हाध्यक्ष डॉ.राजपाल खोब्रागडे, सामाजिक कार्यकर्ते सूर्यजित खोब्रागडे, सामाजिक कार्यकर्ते महेन्द्र कोवले, शांताबाई पाझारे, इत्यादी मंचावर उपस्थित होते. संचालन सामाजिक कार्यकर्ते नंदू खोब्रागडे यांनी केले. पहिल्या दिवशी कळमगाव, वासेरा, मोहाडी, पेटगाव, लाडबोरी, येथील बौद्ध उपासक साखळी उपोषणाला बसले आहेत.