माथेरान अंतर्गत येणाऱ्या जंगलाला अज्ञाताकडून आग
✍🏻श्वेता शिंदे,✍🏻
माथेरान शहर प्रतिनिधी
मो. 8793831051
माथेरान :- माथेरान मधील बाजारपेठ मधील जंगलाला अज्ञाताकडून आग लावण्यात आली यामध्ये येथील शंभर वर्षे जुनी झाडे जळून खाक झाली असून जीवितहानी झाली नसली तरी निसर्गाची हानी मात्र मोठ्या प्रमाणात झाली आहे.नगरपालिकेचे कर्मचारी,वन विभागाचे कर्मचारी यांनी शर्थीचे प्रयत्न करून ही आग आटोक्यात आणली.
बुधवार दि.12 रोजी सकाळी जामा मस्जिदीच्या पश्चिमेस असलेल्या जंगलात आग लागलेली काही नागरिकांनी पहिली.आगीचे रूप रौद्र असल्याने पालापाचोळा तसेच झाडीझुडपे जळून खाक तर झालीच पण 100 वर्षे जुनी 500 फूट उंच झाडे जळू लागली.वेळीच सुज्ञ नागरिकांनी वन विभाग याना कळविले वन विभागाचे कर्मचारी तिथे पोहोचल्यानंतर आग विझविण्याचा प्रयत्न केला तोवर नगरपालिकेचा अग्निशमन बंब बोलाविण्यात आला.झाडांच्या मुळापासून लागलेली आग खोड आणि पानांपर्यंत गेली. अग्निशमन बंबामधील पाईप फुटला असल्याने पाण्याचे प्रेशर देखील कमी होते तसेच कोणीही अनुभवी कर्मचारी नसल्याने पाणी पोहोचण्यास कठीनाई होत होती.नगरपालिकेचे कर्मचारी अन्सार महापुळे यांनी शिडीचा आधार घेऊन पाणी मारून मोठी झाडे वाचविण्याचा आटोकाट प्रयत्न केला आणि त्यात ते यशस्वी देखील झाले.
ही आग कोणत्या कारणाने लागली असावी हे अजून स्पष्ट झाले नाही.ही जागा मोक्याची असल्याने इथे कोणाला ही जमीन हवी आहे का असे तर्कवितर्क जोडले जात आहेत.हा भाग ओसाड करून ही जागा कोणाच्या घशात घालायची आहे का?अशी चर्चा माथेरानमध्ये आहे.मात्र ही जागा वन विभागाची असल्याने वन विभाग कसा तपास करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.याच्या बाजूची वन विभागाची काही जागा हॉटेलवाल्याच्या कंपाउंडला जोडली आहे.हे माहीत असूनही वन विभाग याकडे दुर्लक्ष करत आहे.ही आग कोणी व का लावली आहे याचा सखोल तपास वन विभागाने करून दोषींला कडक शासन करावे अशी मागणी येथील स्थानिक करत आहेत.
