नितेश मेश्राम मृत्यू प्रकरणी एसआयटी चौकशीची शिफारस
उपाध्यक्ष ॲड. धर्मपाल मेश्राम यांची माहिती
मनोज एल खोब्रागडे
✍🏻सह संपादक✍🏻
मो 9860020016
अमरावती : – चांदूर रेल्वे येथील नितेश मेश्राम याच्या मृत्यूप्रकरणी विशेष तपास पथक स्थापन करण्यात यावे, अशी शिफारस करण्यात येणार असल्याची माहिती अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष तथा सदस्य ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी दिली.
यावेळी सहायक आयुक्त समाज कल्याण राजेंद्र जाधवर यांच्यासह पोलिस विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
ॲड. मेश्राम यांनी नितेश मेश्राम यांच्या मृत्यूबाबत पोलिस विभागाशी चर्चा केली. आयोगाकडे तक्रार आल्यानंतर याप्रकरणी चौकशी करण्यात आली. तसेच डॉक्टर, सुरक्षा रक्षक, बाह्यरूग्ण विभागातील कर्मचारी बयाण घेण्यात आले आहे. यात प्रामुख्याने 10 जून रोजी अटक करण्यात आल्यानंतर 13 जून रोजी रूग्णालयात मृत्यू झाला आहे. याबाबत 13 जानेवारी रोजी तक्रार आल्यानंतर 27 जानेवारी आणि 17 फेब्रुवारी रोजी नागपूर येथे बैठक घेण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तपासात निष्काळजीपणा केल्याने गुन्हे दाखल करावे, तसेच अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले आहे.
पिडीताच्या कुटुंबियांना मदत व्हावी यासाठी शासकीय योजनेतून नियमानुसार शेतजमीन देण्यात यावी. तसेच कुटुंबियातील एकाला शासकीय नोकरीत सामावून घेण्याची शिफारस करण्यात आली आहे. पोलिसांनी केलेली कार्यवाही आणि बयानातील तफावत आढळून आली आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून भारतीय पोलिस सेवेतील अधिकाऱ्याकडून याप्रकरणी निष्पक्ष चौकशी करण्यात येणार आहे, असे ॲड. मेश्राम यांनी सांगितले.
