बजाज चंद्रपूर तंत्रनिकेतन मध्ये जागतिक महिला दिन साजरा

बजाज चंद्रपूर तंत्रनिकेतन मध्ये जागतिक महिला दिन साजरा

🖋️ मीडिया वार्ता वृत्तसेवा
📱 8830857351

चंद्रपूर : 12 मार्च
सर्वोदय महिला मंडळ द्वारा संचालित, बजाज चंद्रपूर तंत्रनिकेतनच्या ऑडीओ व्हिजुअल सभागृहामध्ये जागतिक महिला दिनानिमित्य महिला कर्मचाऱ्याच्या वतीने 8 मार्च रोजी जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरदार पटेल महाविद्यालयाच्या प्राध्यापिका शितल पडगीलवार (संगणक विभाग) उपस्थित होत्या, तसेच प्रमुख पाहुणे म्हणून ऍड. स्वाती समर्थ, जिल्हा न्यायालय, चंद्रपूर या उपस्थित होत्या, संस्थेचे उपप्राचार्य दिनेश चौधरी, कमलादेवी शिक्षण महाविद्यालायचे प्राचार्य हेमकांत वाकडे, त्याचप्रमाणे बजाज तंत्रनिकेतन व कमलादेवी शिक्षण महाविद्यालयाच्या महिला कर्मचारी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

आपल्या अध्यक्षीय भाषणात प्रा. शितल पडगीलवार यांनी महिला सबलीकरणाबद्दल आपले विचार व्यक्त केले. त्यांनी सांगितले की जेव्हा महिला स्वतःला सशक्त आणि सन्मानित समजू लागतील तेव्हा त्या समाजात आपली ओळख निर्माण करू शकतील. कार्यक्रमाला लाभलेल्या प्रमुख पाहुणे अॅड. स्वाती समर्थ यांनी महिला संबंधित कायदे उपयोग आणि दुरुपयोग या विषयावर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन बजाज तंत्रनिकेतन व कमलादेवी शिक्षण महाविद्यालयाच्या विद्यार्थीनिनी संयुक्त पणे केले.

या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन बजाज तंत्रनिकेतन व कमलादेवी शिक्षण महाविद्यालय यांच्या सयुंक्त विद्यमाने करण्यात आले.