माथेरानच्या बोहरा समाजाकडून सामाजिक सलोखा राखत, रमजान निमित्त हिंदू बांधवांसोबत इफ्तियार पार्टीचे शानदार आयोजन…

माथेरानच्या बोहरा समाजाकडून सामाजिक सलोखा राखत, रमजान निमित्त हिंदू बांधवांसोबत इफ्तियार पार्टीचे शानदार आयोजन…

✍🏻श्वेता शिंदे✍🏻
माथेरान शहर प्रतिनिधी
मो. 8793831051

माथेरान :- सध्या मुस्लिम व बोहरा बांधवांचे पवित्र रमजान महिन्यातील रोजे सुरू असून रमजान महिन्याला या दोन्ही धर्मात मोठे स्थान आहे. हा महिना चिंतन करुणा आणि परिवर्तनाचा काळ आहे हा काळ आपल्या आत्म्यांना पुननिर्मिती करण्याचा आणि श्रद्धेशी असलेले नाते अधिक दृढ करण्याचा असतो. माथेरान मधील अंजुमन सैफी दाऊदी बोहरा समाज बांधवांच्या 13 व्या रोजाचे औचित्य साधत दि. 12 रोजी माथेरान येथील बुऱ्हान विला बंगल्यात बोहरा समाजाचे धर्मगुरू परमपूज्य डॉ. सय्यदना मोफदल सैफुद्दीन यांच्या मार्गदर्शनाखाली माथेरान मधील हिंदू बांधवांसोबत इफ्तार पार्टीचे शानदार आयोजन करण्यात आले होते.

दाऊदी बोहरा समाज हा जगभरातील 40 हून अधिक देशांमध्ये राहणारा मुस्लिम समुदाय आहे त्यांचे नेते परमपूज्य डॉ सय्यदना मुफद्द्ल सैफुद्दीन यांच्या मार्गदर्शनाखाली बोहरा समाज बांधव हे सामान्यता सुशिक्षित व्यावसायिक आणि विविध क्षेत्रातील पात्र व्यावसायिक आहेत त्यांच्या विशिष्ट संस्कृतीमुळे ते त्यांच्या परंपरांशी प्रामाणिक राहून आधुनिकता स्वीकारण्याचा प्रयत्न करत असतात आणि सक्रिय शांतप्रिय आणि कायद्याचे पालन करणारे या समाजाचे नागरिक असतात जे संपूर्ण मानवतेच्या कल्याणासाठी समर्पित होत असतात. या समाजाच्या सर्वच धर्मगुरूंचे माथेरान या पर्यटन स्थळावरील शांतता व अल्लादायक वातावरण येथील निसर्गामुळे या ठिकाणी अधिक सहवास तसेच आकर्षण राहिले आहे. या बोहरा समाजाचे 51 वे धर्मगुरू परमपूज्य स्व. डॉ. सय्यदना ताहेर सैफुद्दीन यांनी माथेरानच्याच भूमीत 12 नोव्हेंबर 1965 साली अखेरचा श्वास घेतला होता.तर 52 वे धर्मगुरू परमपूज्य स्व.डॉ. सय्यदना मोहम्मद बुराणुद्दीन यांचे देखील माथेरानवर विशेष प्रेम होते. सध्याचे बोहरा समाजाचे वारसदार 53 वे धर्मगुरू परमपूज्य डॉ.
सय्यदना मुफद्दल सैफुद्दीन यांच्या मार्गदर्शनाखाली समाजाच्या प्रगतीसाठी सामाजिक हिताचे अनेक उपक्रम हाती घेतले जात आहेत. माथेरान मध्ये देखील बोहरा समाजाच्या वतीने वृक्षारोपण, स्वच्छता अभियान असे अनेक सामाजिक बांधिलकी जपणारे उपक्रम राबविले जातात या ठिकाणी दरवर्षी न चुकता पवित्र रमजान महिन्यात जातीय सलोखा तसेच राष्ट्रीय एकात्मता जपण्याच्या दृष्टिकोनातून माथेरानच्या अंजुमन सैफी दाऊदी बोहरा समाजाच्या वतीने येथील हिंदू बांधवासोबत इपतीयार पार्टीचे आयोजन करण्यात येते .यावेळी देखील माथेरान बोहरा समाजाच्या बांधवांनी 13 व्या रोजा निमित्त इफ्तियार पार्टीचे शानदार आयोजन केले होते. यावेळी आलेल्या मान्यवरांना भेटवस्तू देऊन येतोचित सन्मान करत पारंपारिक वेगवेगळ्या जिन्नसांसह भोजनाची मेजवानी देऊन आदरतिथ्य करण्यात आले . या इफ्तेआर पार्टीचे आयोजन करताना अंजुमन सैफी दाऊदी बोहरा समाज माथेरान अध्यक्ष मुल्ला जुजर मुल्ला सैफुद्दीन, फिरोज मालवावाला, अब्बास राणीयावाला , अब्बास उदयपूरवाला, मुस्तफा माथेरानवाला, मुर्तुजा माथेरानवाला, अब्दुल कादिर माथेरानवाला, युसुफ नेरळवाला, इस्माईल मालवावाला, बुरानुद्दीन माथेरानवाला तसेच बुरान विल्ला बंगल्याचे व्यवस्थापक अब्बासभाई कमरी यांनी विशेष परिश्रम घेतले होते.

याप्रसंगी माथेरानचे माजी उपनगराध्यक्ष आकाश चौधरी, चंद्रकांत जाधव , भाजप शहराध्यक्ष प्रवीण सपकाळ,माजी नगरसेवक प्रसाद सावंत, प्रदीप घावरे, शिवाजी शिंदे ,माजी नगराध्यक्ष मनोज खेडकर, किरण चौधरी, शैलेश चाफेरकर, सुनील शिंदे, रायगड प्रेस क्लबचे संघटक दिनेश सुतार , मिलिंद कदम आदी मान्यवर उपस्थित होते.