पोटेगाव मार्गावर अवैध दारू विकणाऱ्या महिलेवर कारवाई

पोटेगाव मार्गावर अवैध दारू विकणाऱ्या महिलेवर कारवाई

✍️लुकेश कुकडकर✍️
गडचिरोली तालुका प्रतिनिधी
मो 8999904994

गडचिरोली : काही दिवसांपूर्वीच पोटेगाव मार्गावर इतर व्यवसायांच्या नावाखाली अवैध दारूविक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली होती. अशातच पुन्हा चिकन व्यवसाय थाटून दारू विक्री करणाऱ्या एका महिलेवर गडचिरोली पोलिस व मुक्तिपथने कारवाई करीत 2 हजार 660 रुपयांची देशी दारु जप्त केली आहे.

गडचिरोली शहरातील पोटेगाव मार्गावर चिकन विक्रीच्या दुकानातून एक महिला दारुविक्री करीत असल्याची गुप्त माहिती मिळाली. प्राप्त माहिती नुसार पोलिस व मुक्तिपथ टिमने सदर दुक‌ानाची तपासणी केली असता 38 नग देशी दारू आढळून आली. 2 हजार 660 रुपयांचा मुद्देमाल जप्त करीत ताजू फैयाज शेख (३८) या महिलेवर गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई पोलीस कर्मचारी धनंजय चौधरी, वृषाली चव्हाण यांनी केली. यावेळी मुक्तिपथ संघटक रेवनाथ मेश्राम उपस्थित होते.