नागपूर महानगरपालिकेच्या प्रियदर्शिनी मराठी उच्च प्राथमिक शाळा फुटाळा येथील विद्यार्थ्यांनी दुर्गुणांची होळी केली साजरी
✍🏻मंजुषा सहारे ✍🏻
नागपूर शहर प्रतिनिधी
मो.9373959098
नागपूर :- सविस्तर वृत्त पुढील प्रमाणे नागपूर महानगरपालिकेच्या प्रियदर्शिनी मराठी उच्च प्राथमिक शाळा फुटाळा येथील विद्यार्थ्यांनी दुर्गुणांची होळी साजरी केली. विद्यार्थ्यांनी विविध वाईट गुण कागदांवर लिहिले आणि त्याचे होळीसोबत दहन केले. आपल्यातील दुर्गूणांचे दहन करुन नियमित चांगले वागण्याचा संकल्प चिमुकल्या विद्यार्थ्यांनी केला. शाळेच्या मुख्याध्यापिका डॉ. वसुधा वैद्य यांच्या संकल्पनेतील या अभिनव उपक्रमाचे मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी, अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल यांनी कौतुक केले. दुर्गुणांच्या होळीचे दहन करताना विद्यार्थी, शिक्षक आणि पालक आवर्जून उपस्थित होते.
