आदिवासी समाजाची संस्कृती,रूढी परंपरा व कला जोपासणे गरजेचे-मा.राजे अम्ब्रीशराव आत्राम
पेठा येथे शहीद वीर बाबुराव शेडमाके यांच्या पुतळ्याचे अनावरण
✍️लुकेश कुकडकर✍️
गडचिरोली तालुका प्रतिनिधी
मो 8999904994
गडचिरोली :- देशाच्या स्वतंत्र्यासाठी इंग्रजांशी लढतांना आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या आदिवासी समाजाचे शहीद विर बाबुराव पुल्लेश्वर शेडमाके हे आजच्या युवा पिढीचे आदर्श असावेत.त्यांच्या विरतेची गाथा सगळ्यांना माहित असायला पाहिजे आणि आज आदिवासी समाजाची संस्कृती,रूढी परंपरा व कला जोपासणे गरजेचे आहे असे प्रतिपादन मा.राजे अंब्रीशराव आत्राम यांनी केले.
एटापल्ली तालुक्यातील पेठा येथे 12 मार्च शहीद वीर बाबुराव शेडमाके यांच्या जयंती निमित्ताने भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यकामाचे उदघाटक म्हणून अहेरी इस्टेटचे राजे तथा माजी राज्यमंत्री राजे अंब्रीशराव आत्राम हे होते.पुढे बोलताना ते म्हणाले शहीद वीर बाबुराव शेडमाके यांनी आदिवासी समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी इंग्रजा सोबत कठोर लढा दिला त्यांचा हा संघर्ष आजच्या युवा पिढीसाठी प्रेरणादायी आहे.आणि शहीद विर बाबुराव शेडमाके यांचा हा आज उभारलेला पुतळा युवा पिढीला प्रेरणा देत राहील असे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले.
त्यावेळी त्यांच्या हस्ते सप्तरंगी ध्वजारोहन आणि शहीद वीर बाबुराव शेडमाके यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.तसेच विविध मान्यवरांच्या हस्ते राजे साहेबांचे पुष्पगुछ देऊन स्वागत करण्यात आले.
मा.राजे अंब्रीशराव आत्राम साहेबांचे पेठा गावात आगमन होताच त्यांचे ढोल-ताश्याच्या गजरात मिरवणूक काढत भव्य जंगी स्वागत गावकर्यांनी यावेळी केले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून तोडसा ग्रामपंचायत सरपंच कु.वनिता कोरामी,प्रमुख वक्ते म्हणून कनिष्ठ प्रशासकीय अधिकारी सत्यनारायण कोडापे,प्रमुख पाहुणे म्हणून तालुका कृषी अधिकारी तुषार पवार,उपसरपंच प्रशांत आत्राम,भाजपा महामंत्री मोहन नामेवार,पोलीस पाटील दस्सा कोरमी,लालसू रापांज्जी,रैनू नरोटे, रैजू गावडे,नान्सू मटामी,रामा गोटा,साधू दुर्वा,प्रतिभा तोडेवार,साईनाथ वेलादी आणि मोठया संख्येने गावकरी उपस्थित होते.
