गीता इंडस्ट्रीज कॉटन जिनिंग अँड प्रेसिंग ला लागली आग.

गीता इंडस्ट्रीज कॉटन जिनिंग अँड प्रेसिंग ला लागली आग.

उमरेड.३५०० क्विंटल कापूस २ करोड १९ लाख रुपये अंदाजे नुकसान .

✍️त्रिशा राऊत ✍️क्राइम रिपोर्टर नागपुर मो 9096817953

उमरेड :- उमरेड तालुक्यातीलं बेला येथून ७किमी अंतरावर असलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या पश्चिमेला असलेल्या जसापुर शिवारातील गीता इंडस्ट्रीज कॉटन जिनिंग अँड प्रिसिंगला दि. १३ मार्चला सकाळी १०.५० मिनिटांनी आग लागली. परंतु त्या ठिकाणी असलेल्या कर्मचारी आणि मजूरवर्गांनी तातडीने कुठलाही विलंब न करता असलेल्या सुविधांचा वापर करीत आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला तोपर्यंत अग्निशामकदलाच्या तीन गाड्या सुद्धा घटनास्थळी हजर झाल्या होत्या. त्यानंतर आग नियंत्रणात आली असे समजते

प्राप्त माहितीनुसार सकाळी नेहमीप्रमाणे कापसाची खरेदी सुरू होती खरेदी केलेल्या कापसांच्या गाड्या यार्ड मध्ये रिकाम्या करण्याचे काम चालू होते कापसाच्या ढिगाऱ्यावर बुलेरो पिकप या तीन गाड्या रिकाम्या होणे सुरू होते तेथील एक गाडी बंद झाल्यामुळे गाडीला धक्का मारून सुरू करण्याकरता ढकलल्या जात असताना गाडीच्या सायलेन्सर मधून धुराद्वारे ठिणगी बाहेर आल्यामुळे कापसाच्या ढिगाऱ्याने पेट घेतला आणि काहीक्षणात संपूर्ण कापूस हा आगीच्या भक्षस्थानी आला. अशा प्रकारची माहिती उपस्थितांनी त्या ठिकाणी दिली. कापसाच्या गंजीला लागून सरकीच्या गंजा सुद्धा होत्या परंतु प्रसंग सावधानतेमुळे मोठा अनर्थ टळला.

दशरथ कवडूजी कुबडे यांची प्रतिक्रिया अनावधानामुळे ही घटना घडली आणि वीस मिनिटात संपूर्ण आग परिसरात पसरली परंतु कामगाराच्या सतर्कतेमुळे आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि नेहमी अशाघटनांना तोंड देण्याकरिता अनेक सुविधा निर्माण करून ठेवलेले आहे.