धुलिवंदनाच्या पूर्व संध्येला, पर्यटकांनी नटली जुहू चौपाटी.
✍️ पप्पू वि. नायर ✍️
मुंबई शहर प्रतिनिधी
मो :- 7304654862
मुंबई :- धुलिवंदनाच्या पूर्वसंध्येला पर्यटकांनी नटली जुहू चौपाटी. आज सकाळ पासून धुलिवंदनाच्या रंगांचा वर्षाव करून मुंबईकरानी जुहू चौपाटीला जाणे पसंद केले. बेधुंद होऊन रंगांचा वर्षाव करून कलरफुल शरीरावरील रंग उतरवण्यासाठी म्हणजेच समुद्रांच्या लाटामध्ये अंगोळ करण्यासाठी मुंबईचे नागरिक जुहू चौपाटी ला पोहचले.
व अन्य पर्यटक लागातार 3 सुट्या आल्याने निसर्गाच्या सानिध्यात थंड हवेच्या झरोक्यात व समुद्राच्या लाटांचा दृश्य अनुभवण्यासाठी जुहू चौपाटीला आल्याचे पाहायला मिळाले. अत्यंत नावाजलेला प्रतिष्टीत जुहू चौपाटीचा उल्लेख केला जातो, इथे प्रत्येक दिवशी पर्यटकांची मांदियाळी पहावयास मिळते. सोबत समुद्राच्या किनारानी नटलेला असा निसर्गरम्य सौंदर्य लाभलेला जुहू गावाला एक जणू ईश्वर देणगीच म्हणावी लागेल.
एवढा प्रसिद्ध असा जुहू चौपाटी नवतरुणांना पण भुरळ पाडत असतो. इथे प्रत्येक उत्साहला व मासिक सुट्यांच्या दिवशी पर्यटक मोठ्या प्रमाणात आवर्जून उपस्थिती लावत असतो. पण आज धुलिवंदनाच्या पूर्व संध्येला पर्यटकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळाली. तसेच जुहू च्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यानवरून प्रचंड वाहतूक कोंडी झाल्याचे दिसून आले. त्यामध्ये पोलीस प्रशासनाची मोठी कसरत पाहायला मिळाले.
