अहमदनगर पत्नीने केला प्रेमसंबधातून प्रियकराच्या मदतीने पतीचा मर्डर.

55

अहमदनगर पत्नीने केला प्रेमसंबधातून प्रियकराच्या मदतीने पतीचा मर्डर.

 Ahmednagar wife commits murder of husband with the help of boyfriend out of love affair.

अहमदनगर:- प्रियकरासोबत असलेल्या संबंधात अडचण निर्माण होत असल्याने पत्नीने केलेल्या जबर मारहाण करून पतीचा खून केल्याची घटना नगर जिल्ह्यातील मिरजगाव येथे घडली.

याबाबत सविस्तर असे की मिरजगाव येथील राहणारी विवाहित महिला अनिता प्रमोद कोरडे हिचे योगेश बाळासाहेब बावडकर याच्याशी प्रेमसंबंध होते. या कारणातूनच अनिता हिने तिचा पती प्रमोद बाळासाहेब कोरडे याच्या डोक्यात व शरीरावर लोखंडे फुकणीने बेदम मारहाण केली. या मारहाणीत प्रमोद त्याच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्याच्या मेंदूत रक्तस्राव झाला.

उपचारासाठी त्याला विळद घाट विखे पाटील रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान तेथे त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी प्रमोद याचा भाऊ श्रीकांत बाळासाहेब कोरडे यांनी अनिता कोरडे व योगेश बावडकर या दोघांनी आपल्या भावाचा खून केल्याची फिर्याद कर्जत पोलिसात दिली. त्यावरून पोलिसांनी अनिता व योगेश यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. घटनास्थळाला डीवायएसपी जाधव, पोलिस निरीक्षक यादव यांनी भेट दिली, तर पुढील पोसइ मोरे हे करत आहेत. दरम्यान पत्नीनेच आपल्या पतीचा खून केल्याने परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे.