यवतमाळ जिल्हाधिकारी पदी विकास मीना यांची नियुक्ती

यवतमाळ जिल्हाधिकारी पदी विकास मीना यांची नियुक्ती

रिपब्लिकन सेनेच्या वतीने करण्यात आले स्वागत

✍🏻अशोक गायकवाड✍🏻
उमरखेड तालुका प्रतिनिधी
मो 9561499931

यवतमाळ :- काही दिवसापूर्वी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांची अहिल्यानगर येथे झालेल्या बदलीमुळे रिक्त झालेल्या जागेवर शासनाने नव्याने नियुक्त केलेले विकास मीना यांनी यवतमाळ जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्वीकारला. त्यानिमित्ताने रिपब्लिकन युवा सेनेच्या वतीने त्यांची सदिच्छा भेट घेऊन पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या.
विकास मीना हे राजस्थान मधील छोट्या गावातून येतात. ते हिंदी भाषेच्या माध्यमातुन भारतीय लोक सेवा आयोगाकडून घेण्यात येणाऱ्या परीक्षेमध्ये एक वेळा नाही तर दोन वेळा उत्तीर्ण झाले आहेत. प्रथम प्रयत्नामध्ये भारतीय पोलीस सेवा (IPS) व द्वितीय २०१७ च्या प्रयत्नामध्ये ५६८ वी रँक घेऊन भारतीय प्रशासकीय सेवा (IAS) साठी उत्तीर्ण झाले.
अमरावती येथे परिविक्षाधीन कालावधीत त्यांनी विविध पदावर काम पाहिले. यापूर्वी छत्रपति संभाजीनगर येथे जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होते. यापूर्वी नाशिक जिल्ह्यातील कळवण येथे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय अधिकारी सोबतच उपविभागीय अधिकारी म्हणून कार्यभार सांभाळला.
रिपब्लिकन युवा सेनेच्या वतीने घेण्यात आलेल्या भेटी दरम्यान उमरखेड तालुक्यातील दोन नदीच्या संगमावर वसलेले गाव चिंचोली (संगम) येथील ग्रामस्थांच्या पुलाची उंची वाढवून देण्याच्या प्रलंबित मागणी विषयी आज पर्यंत विविध विभागाकडे केलेला पाठपुरावा जिल्हाधिकारी यांच्या समोर मांडून ओढावणाऱ्या पूर परिस्थितीचे गांभीर्य निदर्शनास आणून दिले.
यावेळी जिल्हाध्यक्ष सुनिल पाटील चिंचोलकर, शहराध्यक्ष शुद्धोधन दिवेकर, शहर उपाध्यक्ष साई पाटील नरवाडे, ता. अध्यक्ष गौतम नवसागरे, ता. संघटक संदीप राऊत, ता. कार्याध्यक्ष साहेबराव कदम इत्यादी मान्यवर उपस्थित होते.