शैला पाटील यांच्याकडून सारळ प्राथमिक शाळेस पुस्तकांची भेट
रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग:- सार्वजनिक वाचनालय अलिबागच्या कार्याध्यक्षा व जनता शिक्षण मंडळ अलिबाग या संस्थेच्या संचालिका सौ.शैला प्रमोद पाटील यांच्याकडून जनता शिक्षण मंडळ प्राथमिक शाळा सारळ च्या विद्यार्थी ग्रंथालयास सुमारे १०० शालेय उपयोगी पुस्तकं भेट देण्यात आली .सध्याच्या मोबाईलच्या युगात वाचन संस्कृतीचा ऱ्हास होत चालला आहे .मुलांना वाचनाची गोडी लागावी, वाचन संस्कृतीचे जतन व्हावे म्हणून त्यांचे हे पाऊल कौतुकास्पद आहे .शाळेतील शिक्षक , पालक व विद्यार्थी यांनी माननीय सौ.शैलाताई पाटील यांचे पुस्तके दिल्या बद्दल आभार मानले.
