नवरा दलित आहे म्हणून आईने फसवून जबरदस्तीने करवला गर्भपात, पोटच्या मुलीला आई-वडिलांनीच दिला धोका.

57

नवरा दलित आहे म्हणून आईने फसवून जबरदस्तीने करवला गर्भपात, पोटच्या मुलीला आई-वडिलांनीच दिला धोका.

नवरा दलित आहे म्हणून आईने फसवून जबरदस्तीने करवला गर्भपात, पोटच्या मुलीला आई-वडिलांनीच दिला धोका.

तामिळनाडू:- आजही आपला देश काही कर्मठ रुढीपरंपरांमध्ये गुंतला आहे. यामुळे आजुबाजूला घडणाऱ्या अनेक घटना चित्त विचलित करणाऱ्या ठरतात. असाच काहीसा प्रकार रेणुका या महिलेबरोबर घडला. चार महिन्यांची गर्भवती असलेल्या रेणूकाला तिच्या आईने फसवून माहेरी बोलवून घेतलं आणि तिला जबरदस्तीने रुग्णालयात नेऊन तिला गर्भपात करण्यास भाग पाडले. तामिळनाडूच्या सालेम याठिकाणी ही घटना घडली आहे. या तरुणीने दलित समाजातील मुलाशी लग्न केल्यामुळे तिच्या आईवडिलांनी हा गर्भपात घडवला. त्यानंतर रेणूकाचा पती पेरूमल याच्या तक्रारीवरून पोलिसांनी रेणूकाची सुटका करण्यात आली असून तिला महिलांच्या सरकारी आश्रयगृहात ठेवण्यात आलं आहे अशी माहिती सालेम पोलिसांनी दिली.

रामनाथपुरमचे असलेले रेणूका आणि पेरुमल यांनी मुलीच्या घरच्यांच्या मर्जीविरुद्ध ऑगस्ट 2020 मध्ये तिरुपूर याठिकाणी लग्न केलं. ही मुलगी 19 वर्षांची असून ती वान्नियार या इतर मागासवर्गीय समाजातील आहे तर तिचा नवरा पेरुमल हा अनुसूचित जमातींतला म्हणजे दलित आहे. त्यामुळे रेणूकाच्या आईवडिलांचा या लग्नाला विरोध होता. तरीही या दोघांनी लग्न केलं आणि ते पेरुमलच्या घरात राहत होते.

21 जानेवारीला रेणूकाच्या आईने आपण आजारी असल्याचं सांगून रेणूकाला तिच्या माहेरी थिरूवाचूरला बोलवून घेतलं. रेणूका चार महिन्यांची गर्भवती आहे हे त्यांना माहीत होतं. त्यांनी तिला घरात कोंडून ठेवलं आणि नवऱ्याशी संपर्क करू दिला नाही. 26 जानेवारीला रेणूकाला अत्तुर इथल्या रुग्णालयात नेऊन तिचा गर्भपात आईवडिलांनीच करवला. दरम्यान चिंतेत पडलेल्या पेरुमलने पोलिसांत तक्रार दाखल केली, अशी माहिती पोलिसांनी दिली.

रेणूकाने दोन दिवसांनी भावाच्या फोनवरून पेरूमलशी संपर्क केल्यानंतर त्याने सालेमच्या पोलिस अधीक्षकांकडेही दुसरी तक्रार नोंदवली. त्यानंतर पोलिसांनी रेणूकाची तिच्या माहेरच्या घरातून सुटका केली आणि तिचे वडील सुब्रमणी आणि आई सेल्वी यांना अटक करण्यात आली आहे. रेणूकाला महिला आश्रयगृहात ठेवण्यात आलं आहे. मीडिया अहवालानुसार, ज्याठिकाणी तिचा गर्भपात झाला त्या रुग्णालयातील डॉक्टरांनाही याची कदाचित कल्पना नसावी की हा गर्भपात बळजबरीने केलेला आहे, असंही पोलीस यावेळी म्हणालेत.