भागवत संकीर्तनाने मन शुद्ध होते – डॉ. अशोकजी नेते

भागवत संकीर्तनाने मन शुद्ध होते – डॉ. अशोकजी नेते

✍️लुकेश कुकडकर✍️
गडचिरोली तालुका प्रतिनिधी
मो 8999904994

गडचिरोली: चामोर्शी तालुक्यातील रामकृष्णपुर १४ नं. येथे पतितपावन नित्य चैतन्यस्वरूप श्री श्री गौरांग यांच्या कृपेने श्री श्री राधाकृष्ण अष्टमप्रहर तारक ब्रह्मनाम संकीर्तन सोहळ्याच्या निमित्ताने श्री श्री कालीमाता पूजा व श्री श्री राधाकृष्ण अष्टमप्रहर संकीर्तन उत्सव दिनांक ११ मार्च ते १७ मार्च २०२५ या कालावधीत सात दिवस व्यापी या धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने भक्तगण उपस्थित होते.

या भागवत संकिर्तनाला मा.खा.तथा भाजपा अनुसुसुचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ.अशोकजी नेते हे उपस्थित राहुन या भागवताला मार्गदर्शन करतांना म्हणाले “भागवत संकीर्तनामुळे आचार-विचारांची देवाण-घेवाण होते, मन शुद्ध राहते, आणि चांगले विचार आत्मसात करण्याची संधी मिळते. अशा धार्मिक कार्यक्रमांची आजच्या काळात नितांत आवश्यकता आहे.” असे प्रतिपादन मा. खा.डॉ. अशोकजी नेते यांनी केले.

धार्मिक कार्यक्रमाची महती सांगताना डॉ. नेते पुढे म्हणाले, “आजच्या धकाधकीच्या जीवनात मन स्थिर ठेवण्यासाठी, संस्कार
जोपासण्यासाठी व चांगले विचार आत्मसात करण्यासाठी संकीर्तनासारखे कार्यक्रम महत्त्वाचे ठरतात. भागवत संकीर्तनातून भगवंताच्या कृपेची अनुभूती मिळते.”
यावेळी बोलताना त्यांनी लोकसभेत केलेल्या सहकार्याबद्दल व विधानसभा निवडणुकीत भाजप उमेदवारांना भरघोस मतांनी विजय मिळवून दिल्याबद्दल गावकऱ्यांचे आभार मानले.

या कार्यक्रमास भाजप जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे, जिल्हा महामंत्री प्रकाशजी गेडाम, किसान मोर्चाचे प्रदेश सचिव रमेशजी भुरसे, जेष्ठ नेते मनमोहन बंडावार, तालुका महामंत्री विनोद गौरकर, सरपंच रतन मंडल, डाँ. परिमल हलदार, दूलाल मंडल, सुरेश गुंतीवार, बल्लमवार सर,बुथ प्रमुख विमल मंडल, गोलफ तडफदार, अशोक सरकार यांच्यासह रामकृष्णपुर गावातील नागरिक बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.