भावी डॉक्टरांच्या भविष्याशी खेळ नको:आ. डॉ. नितीन राऊत

भावी डॉक्टरांच्या भविष्याशी खेळ नको:आ. डॉ. नितीन राऊत

✍🏻मंजुषा सहारे ✍🏻
नागपूर शहर प्रतिनिधी
मो. 9373959098

नागपूर :- विधानसभेचा तिसरा आठवडा सुरु आहे त्यात नागपूर चे आमदार डॉ नितीन राऊत यांनी नागपूर शासकीय दंत महाविद्यालय
व रुग्णालय येथील अधिष्ठाता डॉ. अभय दातारकर यांनी विद्यार्थ्यांशी छळ करून शैक्षणिक सत्र २०२४-२५ मधील परीक्षेचे प्रवेशपत्र रोखले, प्रगत शिक्षणाच्या नावाखाली विद्यार्थ्यां कडून देणगी वसूल केली तसेच विद्यार्थ्यांची हजेरी न लावता “प्रॅक्टिकल मध्ये तुम्ही मार्क कसे घेता” अशी धमकी देऊन भावी डॉक्टरांच्या भविष्याशी खेळ खेळला आहे. अधिष्ठाता डॉ. दातारकर यांच्यावर मुलाच्या वैद्यकीय शिक्षणाकरिता फर्जी नॉन-क्रिमीलेयर प्रमाणपत्राचा वापर करून प्रवेश मिळवल्याचाही आरोप आहे.
या पार्श्वभूमीवर आज विद्यार्थ्यांच्या आवाज मुंबई येथील अधिवेशनात उचलून अधिष्ठाताला बडतर्फ करून चौकशीची मागणी आमदार डॉ नितीन राऊत यांनी केली.
तसेच बीडीएसच्या अंतिम वर्षातील २५ विद्यार्थ्यांचे पुन्हा प्रात्यक्षिक परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांना न्याय देण्याची मागणी आमदार डॉ नितीन राऊत यांनी केली आहे.