शिव जयंती निमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रभाग क्र.56 शाखा गोरेगांव तर्फे श्रमदान.
✍️ पप्पू वि. नायर ✍️
मुंबई शहर प्रतिनिधी
मो :- 7304654862
मुंबई :- महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रभाग क्र. 56 गोरेगांव शाखेतर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त एक आगळा वेगळा श्रमदानाचा कार्यक्रम अर्नाळा किल्यावर घेण्यात आला.
मनसे अध्यक्ष :- श्री राजसाहेब ठाकरे हे त्यांच्या प्रत्येक भाषणातून सांगत असतात कि महाराजांचे खरे स्मारके हे त्यांचे गड किल्ले आहेत, त्यांच संवर्धन होणं गरजेचं आहे. व ते जोपसण्याचे काम आपण सर्वांचे आहे, जर तेच गडकिल्ले व्यवस्थित नसतील तर आपल्यानंतर येणाऱ्या पिढीला आपण महाराजांचा इतिहास कसा सांगणार. त्याच अनुषंगाने गोरेगांव महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शाखा अध्यक्ष – श्री. भूषण फडतरे देशमुख यांच्या संकल्पनेतून व त्यांच्या इतर सभासदांनी आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त अर्नाळा किल्यावर जाऊन किल्ला साफसफाई करून किल्ल्याची डागडुजी केली गेली. त्यांच्या या आगळ्या वेगळ्या उपक्रमचा सर्वत्र कौतुक झाल्याचे पाहायला मिळाले.