अवैध दारू तस्करी करणारे आरोपी पोलिसांच्या ताब्यात
✍️लुकेश कुकडकर✍️
गडचिरोली तालुका प्रतिनिधी
मो 8999904994
गडचिरोली : गोंडपिपरी येथून आष्टी येथे येणाऱ्या ट्रॅव्हलमधून प्रवास करणाऱ्या दोन महिला व एक पुरुष आष्टी येथे बसस्टॉपवर उतरले. त्यांच्या पिशव्यांची तपासणी करण्यात आली. त्यात दारूच्या बॉटल आढळून आल्या. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडील मुद्देमाल जप्त केला.
सुनील प्रभाकर झोडे (५२, रा. चंद्रपूर) याच्याकडून दोन लिटरच्या चार विदेशी दारूच्या बाटल्या, सपना कैलास बोदलवार (३५, रा. चंद्रपूर) हिच्या पिशवीत चार बाटल्या, रंजना अशोक कोंडावार (४०) हिच्या पिशवीची पाच बाटल्या आढळल्या. दुसऱ्या कारवाईत आष्टी पोलिसांनी कुनघाडा (माल) येथे दारूची वाहतूक करणारा भूमलिंगण सुनगरवार याच्याकडून एक पेटी दारू व ५० लिटर मोहाची दारू जप्त करण्यात आली. त्याची किंमत १८ हजार रुपये एवढी आहे. चारही आरोपींना अटक करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील कारवाई पोलिस निरीक्षक विशाल काळे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे. होळीच्या सणानिमित्त आठ दिवसांपासून वाहनांची तपासणी करण्यात येत आहे. चंद्रपूर जिल्ह्यातून अवैध दारू वाहतूक होत आहे. पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. पोलिस आणखी कडक मोहीम राबविणार असल्याची माहिती आहे