१९ मार्च ला लॉयड्स अँड मेटल्सच्या गडचिरोली डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग (GDPL) चा अंतिम सामना

१९ मार्च ला लॉयड्स अँड मेटल्सच्या गडचिरोली डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग (GDPL) चा अंतिम सामना

यानिमित्ताने विश्वविख्यात गायक सोनू निगम यांच्या गायनाच्या कार्यक्रमाचे आयोजन

स्थानिक खेळाडूंना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्याचा लॉयड्स अँड मेटल्स कंपनीचा मानस

✍️लुकेश कुकडकर✍️
गडचिरोली तालुका प्रतिनिधी
मो 8999904994

गडचिरोली : लॉयड्स अँड मेटल्स कंपनीच्या वतीने गडचिरोली एमआयडीसी परिसरात 5 फेब्रुवारी 2025 पासून गडचिरोली डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग (GDPL -2025)भव्य दिव्य क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात आले. या क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना 19 मार्च सायंकाळी ५ वाजता होणार असून यानिमित्त विश्वविख्यात गायक सोनू निगम यांच्या गायनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आपल्याच जिल्ह्यातील स्थानिक खेळाडूंना राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सुरू असलेल्या या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी जिल्हा वासियांनी मोठ्या संख्येने उपस्थित दर्शवावी असे आवाहन गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार तथा भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाचे उपाध्यक्ष डॉक्टर देवरावजी होळी केले आहे.

लॉयड्स अँड मेटल्स च्या वतीने भव्य दिव्य अशा स्टेडियमचे उभारणी करून उत्तम खेळाचे वातावरण निर्माण केले. विश्वविख्यात क्रिकेटपटू रवी शास्त्री यांच्या उपस्थितीत या सामान्यांचा उद्घाटन सोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न झालेला होता. त्यानंतर एक महिना चाललेल्या या स्पर्धेमध्ये जिल्ह्यातील स्थानिक खेळाडूंनी आपल्या खेळाचा उत्तम परिचय करून दिला. आपल्या स्थानिक खेळाडूंचा उत्साह वाढवण्यासाठी आपणही जिल्हा वासियांनी आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन माजी आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी केली आहे.