शिवशंभू शौर्यगाथा महानाट्याने शिवभक्तांच्या डोळ्याचे पारणे फेडले

शिवशंभू शौर्यगाथा महानाट्याने शिवभक्तांच्या डोळ्याचे पारणे फेडले

राजाभाई केणी यांचे लोकसेवेचे कार्य कौतुकास्पद – आमदार महेंद्रशेठ दळवी

रत्नाकर पाटील रायगड ब्युरो चीफ 

अलिबाग :- हेमनगर येथील शिवनेरी ग्रुप सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा शिवसेना जिल्हाप्रमुख राजाभाई केणी व ग्रामपंचायत कुसुंबळे उपसरपंच रसिका ताई केणी त्यांच्या संकल्पनेतून छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सवानिमित्त

शिवशंभू शौर्यगाथा महानाट्य प्रयोगाचे भव्य दिव्य असे आयोजन सुर्या रोशनी कंपनी मैदानावर करण्यात आले होते.

शिवदुर्ग मित्र प्रस्तुत व प्रविण नंदकुमार देशमुख लिखीत शिवशंभू शौर्यगाथा महानाट्याने शिवभक्तांच्या डोळ्यांचे पारणे फेडले, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या शौर्याची गाथा याची देही याची डोळा पाहण्यासाठी शिवभक्त हजारोंच्या संख्येत उपस्थित होते.

महानाट्यातील प्रमुख आकर्षण म्हणजे
आक्रमक शौर्य लढाया,पोवाडे,लावणी, कव्वाली,२५० कलाकार,जिवंत तोफा
मर्दानी खेळ,१०० फुटी भव्य दोन मजली रंगमंच, गणेशवंदना,गोंधळ आणि रंगमंचावर प्रत्यक्ष घोडे, उंट, बैलगाड्या तसेच इतिहासातील महाराजांच्या जीवनावरील शौर्यगाथा सदर करणारे ऐकून एक कलाकार यांनी हुबेहूब अंगिकारली केला अंगावर काटा आणि डोळ्यात पाणी आणणारी होती.

कार्यक्रमाला आमदार महेंद्र दळवी, जिल्हाधिकारी किसन जावळे, राजिप मुख्य कार्यकारी अधिकारी भरत बास्टेवाड, रायगड पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे,भाजप जिल्हा चिटणीस महेश मोहिते,कामगार नेते दिपक रानवडे, नगरसेविका जयश्री वावेकर,शिवसेना जिल्हाप्रमुख राजाभाई केणी, रसिकाताई केणी आदी मान्यवर तसेच शिवनेरी ग्रुप संस्थेचे पदाधिकारी,ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

_राजा केणी यांचे कार्यकौतुकास्पद _

शिवनेरी ग्रुप सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजाभाई केणी यांनी लावलेले छोट्याशा वृक्षाचे आता वटवृक्ष झाले आहे. शून्यातून निर्माण होत लोकांना देण्याची दानत तसेच खऱ्या अर्थाने लोकांच्या गरजा ओळखून लोकांची प्रामाणिकपणे सेवा करणारा कार्यकर्ता ते नेता असा प्रवास राजाभाईचा आहे यामुळेच खारेपाटातील लोकांचे प्रेम त्याच्यावर असल्याचे सांगत राजाभाई केणी,रसिकाताई केणी यांनी केलेल्या शिवजयंती उत्सव कार्यक्रमाच्या आयोजनाचे कौतुक करत आमदार महेंद्रशेठ दळवी यांनी उपस्थित शिवभक्तांना शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या.

_२६ वर्ष संस्थेकडून जनसेवेचे कार्य _

एखादी संस्था काढणे सोपे असते पण ती संस्था टिकून ठेवणे मोठे जिकिरीचे असते.गेले २६ वर्ष शिवनेरी ग्रुप सेवाभावी संस्थेकडून जनसेवा करण्यात येत आहे तसेच सर्व जनतेच्या सहकार्यातून शिवजयंती उत्सव आणि विविध समाजोपयोगी कार्यक्रम करण्यात येत आहेत आज शिवशंभू शौर्यगाथा या महानाट्याचे आयोजन करण्यात आले असल्याचे अध्यक्ष तथा शिवसेना जिल्हाप्रमुख राजाभाई केणी यांनी सांगितले.
_______________