जळगाव तालुक्यात अवैध गौणखनिज उत्खननावर मोठी कारवाई – ३ ट्रॅक्टर जप्त, गुन्हा दाखल!
मनोज एल खोब्रागडे
✍️सह संपादक✍️
मो 9860020016
जळगाव :- उपविभागीय दंडाधिकारी जळगाव व उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी नायब तहसीलदार, महिला तलाठी, मंडळ अधिकारी व पोलीस बंदोबस्तासह आव्हाणे आणि खेडी (ता. जळगाव) येथे अवैध गौणखनिज उत्खननाविरोधात मोठी कारवाई केली.
🚜 मुख्य कारवाईचे मुद्दे:
✅ खेडी नदीत प्रत्यक्ष उतरून ३ ट्रॅक्टर जप्त
✅ तालुका पोलीस ठाण्यात संबंधितांवर गुन्हा दाखल
✅ सुमारे ५० ब्रास वाळू साठा जप्त करण्याचे आदेश
✅ अवैध उत्खनन रोखण्यासाठी पुढील कठोर उपाययोजना सुरू
💡 अवैध गौणखनिज उत्खनन आणि वाहतूक करणाऱ्यांविरोधात प्रशासन कठोर कारवाई करत आहे. दोषींवर कठोर दंडात्मक कारवाई केली जाणार असून, नागरिकांनी अशा बेकायदेशीर कृत्यांविरोधात सहकार्य करावे.