केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा शनिवारी अमरावती दौरा

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा शनिवारी अमरावती दौरा

मनोज एल खोब्रागडे
✍🏻सह संपादक✍🏻
मो 9860020016

अमरावती :- केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी शनिवार, दि. 22 मार्च रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे.

त्यांच्या दौऱ्यानुसार, श्री. गडकरी यांचे सकाळी 10.15 वाजता बेलोरा विमानतळ येथे आगमन होईल. त्यानंतर सकाळी 10.30 वाजता शिवाजी शिक्षण संस्थेतर्फे छत्रपती शिवाजी महाराज सभागृह येथे आयोजित डॉ. पंजाबराव उर्फ भाऊसाहेब देशमुख पुरस्कार वितरण सोहळ्याला उपस्थित राहतील. दुपारी 12.15 वाजता श्री संत अच्युत महाराज हृदयरोग रुग्णालयातील नवीन कॅथलॅबच्या उद्घाटनाला उपस्थित राहतील. दुपारी 1.45 वाजता शारदा उद्योग मंदिराच्या प्रकल्पाला भेट देतील. दुपारी 2.30 वाजता विश्रामगृह येथे अमरावती विभागातील राष्ट्रीय महामार्ग आणि भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या प्रकल्पांची आढावा बैठक घेतील. सायंकाळी 3.45 वाजता नूतन विदर्भ शिक्षण मंडळाच्या न्यू हायस्कूलला भेट देतील. त्यानंतर सायंकाळी 4.45 वाजता बेलोरा विमानतळ येथून मुंबईकडे प्रयाण करतील.