जागतिक वन दिनानिमित्त विद्यार्थ्यांना जंगल भ्रमंती 

जागतिक वन दिनानिमित्त विद्यार्थ्यांना जंगल भ्रमंती 

सामाजिक वनीकरण विभागाचा उपक्रम रक्तदान शिबिराचे आयोजन

✍️ लुकेश कुकडकर ✍️
गडचिरोली तालुका प्रतिनिधी
मो 8999904994

गडचिरोली : वनांचा मानवी जिवनाशी असलेला सरळ संबंध, जंगलावर अवलंबून असणारी प्राचीन औषध प्रणाली आणि सोबतच जंगलावर आपली उपजीविका भागवणाऱ्या जमाती आणि जैवविविधता याबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागरुकता पसरवण्यासाठी आणि जंगल निर्माण, संवर्धन आणि संरक्षणाच्या उद्येशपूर्तीसाठी सामाजिक वनीकरण विभागामार्फत दिनांक 21 मार्च 2025 रोजी जागतिक वन दिनानिमित्त मूतनूर टेकडी ट्रेकींग व गुरवळा नेचर सफारीचे आयोजन करण्यात आले होते. सर्वप्रथम वनपरिक्षेत्र कार्यालय सामाजिक वनीकरण गडचिरोली याठिकाणी पीएम श्री जवाहरलाल नेहरु उच्च प्राथमिक शाळा, रामनगर येथील शिक्षक व 50 विद्यार्थी यांचे समवेत जागतिक वनदिनाचे उद्घाटनीय कार्यक्रम घेण्यात आला. सदर कार्यक्रमामध्ये अध्यक्षीय स्थानावरुन बोलताना श्री गणेशराव अं. झोळे, विभागीय वनअधिकारी सामाजिक वनीकरण विभाग गडचिरोली यांनी विद्यार्थ्यांना जागतिक वन दिनाचे महत्व विषद करुन तो का साजरा करण्यात येतो याबाबत मार्गदर्शन केले.

सकाळी 9.00 वाजता विद्यार्थ्यांना मुतनूर याठिकाणी नेण्यात येऊन त्यांना टेकडी ट्रेर्कीग चा प्रत्यक्ष अनुभव देऊन त्यांचा निसर्गाशी थेट संबंध जुळवण्यात आला. दुपारी विद्यार्थ्यांना गुरवळा नेचर सफारी मध्ये वनभ्रमती चे माध्यमातून त्यांना वृक्षांचे विविध प्रजाती, वनज्यीवाबाबत माहिती देण्यात आली. जंगली प्राण्यांचे पाऊल खुणा, विष्टा दाखवून त्यांना प्राण्यांची ओळख करुन देण्यात आली. गुरवळा नेचर सफारीमध्ये विद्यार्थ्यांना निलगाय, मोर, हरिण, घुबड, घोरपड, रानडुक्कर,कोल्हा इत्यादी वन्यजीवांचे प्रत्यक्ष दर्शन झाले. सदर कार्यक्रमात सर्पमित्र व पर्यावरणप्रेमी श्री अजय कुकडकर यांनी विद्यार्थ्यांना मानव-जीवन संर्घष व विविध सापांचे प्रजाती याबाबत माहिती दिली.
तसेच दिनांक 22 मार्च 2025 रोजी जागतिक वन दिन तसेच 22 मार्च 2025 रोजी जागतिक जल दिनानिमित्त वनपरिक्षेत्र कार्यालय सामाजिक वनीकरण चांदाळा रोड गडचिरोली याठिकाणी रक्त दान शिबिराचे आयोजन करण्यात आले. जिल्हा शल्य चिकित्सक सामान्य रुग्णालय गडचिरोली येथील वैधकीय चमूनी रक्त दाते यांचे आरोग्याची तपासणी केली. आरोग्य तपासणी अंती एकूण 17 रक्तदाते पात्र ठरुन त्यांचे रक्त पिशवीत गोळा करण्यात आले.