शहरातील पाणी टंचाई आणि पूरपरिस्थिती आढावा

शहरातील पाणी टंचाई आणि पूरपरिस्थिती आढावा

मा. महसूल मंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतली आढावा बैठक

✍🏻मंजुषा सहारे✍🏻
नागपूर शहर प्रतिनिधी
मो.9373959098

नागपूर :- सविस्तर माहिती याप्रमाणे आहे की नागपूर महानगर पालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व विभागातील व शहरातील पाणी टंचाई आणि पूरपरिस्थिती आढावा व उपाययोजनांवर छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीमधील आयुक्त सभाकक्षात मा. महसूल मंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवारी (ता. 22) आढावा बैठक घेतली. यावेळी मा. आमदार श्री. कृष्णा खोपडे, मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, मुख्य अभियंता लीना उपाध्ये, अधीक्षक अभियंता श्री. मनोज तालेवार, डॉ. श्वेता बॅनर्जी, उपायुक्त श्री. मिलिंद मेश्राम, श्री. प्रकाश वराडे, श्री गणेश राठोड यांच्यासह सर्व झोनचे सहायक आयुक्त आणि इतर अधिकारी उपस्थित होते.