नेहरू युवा केंद्राच्या वतीने जिल्हास्तरीय क्रीडा यशस्वीरित्या संपन्न……….
रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग:- नेहरू युवा केंद्र अलिबाग, यांच्या माध्यमातून व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, रायगड-अलिबाग, प्रिझम सामाजिक विकास संस्था, यांच्या सहकार्याने नेहरू युवा केंद्राचे युवा अधिकारी निशांत रौतेला यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली नुकत्याच जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेत 100 मीटर धावणे, गोळा फेक, या स्पर्धा जिल्हा क्रीडा संकुल नेहुली या ठिकाणी संपन्न झाल्या तसेच मुलांसाठी कबड्डी स्पर्धा, मुलींसाठी खो-खो या स्पर्धा पीएनपी माध्यमिक शाळा, गोकुळेश्वर,वेश्वी या संपन्न झाल्या. यावेळी मान्यवर म्हणून ॲड. कला ताई पाटील- महाराष्ट्राच्या उत्कृष्ट गायिका, प्राजक्ता कोकणे- आंतरराष्ट्रीय कोरिओग्राफर, पी.एन.पी. कनिष्ठ विद्यालयाचे उपप्राचार्य- निशिकांत कोळसे, आंतरराष्ट्रीय खेळाडू तथा राष्ट्रीय युवा पुरस्कारार्थी भारत सरकार तपस्वी गोंधळी, स्वयंसिद्धा संस्थेच्या अध्यक्षा तथा स्पर्धा विश्व अकॅडमीच्या संचालिका सुचिता साळवी, नेहरू युवा केंद्राचे प्रतिनिधी जयेश म्हात्रे, पंच म्हणून लाभलेले यतीराज पाटील, शिक्षक सहकारी तेजस म्हात्रे,पी.एन.पी. कनिष्ठ विद्यालयाचे शिक्षक सहकारी, नुकतीच मुंबई पोलीस पदी निवड झालेली स्पर्धा विश्व अकॅडमी ची विद्यार्थिनी दिव्या मोकल, रायगड पोलीस शिवानी चव्हाण, राष्ट्रीय खेळाडू ऋतुजा सकपाल, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाचे कर्मचारी व स्पर्धेत सहभागी झालेले बहुसंख्य खेळाडू उपस्थित होते. मान्यवरांनी उपस्थित खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. पुरुष खुलागट कबड्डी स्पर्धेत पी.एन.पी. कनिष्ठ विद्यालयाने प्रथम क्रमांक पटकावला तर स्पर्धा विश्व अकॅडमी अलिबाग द्वितीय क्रमांक, प्रिझम टीम तृतीय क्रमांक तर महिला खो-खो खुलागट अजिंक्य क्रीडा संस्था, अलिबाग एक. के. एस. यांनी प्रथम क्रमांक पटकावला, स्पर्धा विश्व अकॅडमी द्वितीय क्रमांक, प्रिझम संस्था तृतीय क्रमांक, 100 मीटर धावणे पुरुष खुलागट गौरव महेंद्र पाटील- कुलाबा क्रीडा प्रबोधनी, अक्षय अशोक देसाई द्वितीय क्रमांक, शिवकुमार निलंगे तृतीय क्रमांक, 100 मीटर धावणे महिला खुलागट रिया राकेश गुंजाळ प्रथम क्रमांक, नेहा संदीप मानकर -द्वितीय क्रमांक, साक्षी शशिकांत पाटील – तृतीय क्रमांक, गोळा फेक स्पर्धेत मुलींमध्ये हर्षाली गावंड प्रथम क्रमांक, ओवी पाटील द्वितीय क्रमांक, जीविका म्हात्रे तृतीय क्रमांक, गोळा फेक मुले श्लोक नाईक – प्रथम क्रमांक, केतन राणे- द्वितीय क्रमांक, श्रेयस पाटील- तृतीय क्रमांक मिळविला. सर्व विजेत्या खेळाडूंना प्रमाणपत्र मेडल देऊन सन्मानित करण्यात आले. सदर स्पर्धा यशस्वी होण्याकरिता प्रिझम संस्थेच्या सहकार्यानी परिश्रम घेतले.